Tim Cook: अ‍ॅपलचे सीईओ टीम कूक अँटिलियात, अंबानी कुटुंबियांनी केलं स्वागत; व्हिडिओ व्हायरल

अॅपलच्या भारतातील पहिल्या शोरुमचे उद्या मुंबईत उद्घाटन होत आहे. यापार्श्वभूमीवर कूक यांनी अंबानींची भेट घेतली.
Apple CEO Tim Cook
Apple CEO Tim CookSakal
Updated on

मुंबई : आयफोन बनवणाऱ्या अॅपल या मोबाईल कंपनीचे सीईओ टीम कूक हे भारताच्या दौऱ्यावर आले आहेत. मंगळवारी रात्री त्यांचं मुंबईत आगमन झालं, कुलाब्यातील हॉटेल ताल पॅलेसमध्ये कूक यांचा मुक्काम असणार आहे. तत्पूर्वी कूक यांनी उद्योगपती मुकेश अंबानी यांची घरी भेट दिली. यानंतर ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची देखील भेट घेतील असं सांगितलं जात आहे.(Apple CEO Tim Cook spotted at Mukesh Ambani Antilia in Mumbai)

भारताची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये अॅपलच्या भारतातील पहिल्या स्टोअरचं उद्घाटन होणार आहे. १८ एप्रिलपासून अॅपलचं हे आऊटलेट ग्राहकांसाठी खुलं होणार आहे. त्यानंतर नवी दिल्लीतील साकेत भागात लवकरच अॅपलं दुसरं स्टोअर सुरु होणार आहे. स्वतः अॅपलचे सीईओ टीम कूक यांच्या हस्ते या स्टोअर्सचे उद्घाटनं होणार आहेत. यावेळी कूक पंतप्रधान मोदींची भेट घेऊ शकतात.

Apple CEO Tim Cook
BMC Wards latest news: मुंबई महापालिकेबाबत मोठी अपडेट! हायकोर्टाचा ठाकरे गटाला दणका

दरम्यान, कूक हे अंबानी याच्या भेटीसाठी त्यांचं निवासस्थान अँटेलियालात दाखल झाले आहेत. याचा व्हिडिओ व्हायरल भयानी या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन समोर आला आहे. यामध्ये मुकेश अंबानी यांचे पुत्र आकाश आणि इशा अंबानी हे दोघे अँटिलियाच्या गेटवर कूक यांच्या स्वागतासाठी पोहोचले होते.

Apple CEO Tim Cook
Judiciary Can Save India: "देशाला आता केवळ न्यायव्यवस्थाच वाचवू शकते"; 'या' मुख्यमंत्र्यानं व्यक्त केली खंत

बीकेसीमध्ये अॅपलचं जे आऊटलेट सुरु होत आहे ते मुंबईची संस्कृती असलेल्या काळी-पिवळी टॅक्सी आर्टपासून प्रेरित असून ते जिओ वर्ल्ड ड्राईव्ह मॉलमध्ये असणार आहे. हा मॉल अंबानी कुटुंबियांच्या मालकिचा आहे. कूक हे पहिल्यांदाच अँटिलियाला भेट देत नसून यापूर्वी २०१६ मध्ये त्यांनी मुंबईतील सिद्धीविनायक मंदिरात अनंत अंबानी यांची भेट घेतल्यानंतर अँटिलियामध्ये जाऊन जेवण केलं होतं. अंबानी कुटुंबानं त्यांचा चांगला पाहुणचार केला होता. त्यावेळी कूक यांनी बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान याची देखील भेट घेतली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com