अनुकंपा तत्त्वावरील उमेदवारांची किमान वेतन कायद्यानुसार नेमणूक करा

रविंद्र खरात 
शुक्रवार, 6 एप्रिल 2018

कल्याण : कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्या परिवहन उपक्रमातील (केडीएमटी) अनुकंपा तत्वावरील प्रतीक्षा यादीवरील असलेल्या उमेदवारांना जागा रिक्त होई पर्यंत किमान वेतन कायद्यानुसार नेमणूक करा अशी मागणी परिवहन कामगार कर्मचारी संघटना अध्यक्ष आणि नगरसेवक प्रकाश पेणकर यांनी पालिका आयुक्त गोविंद बोडके यांच्याकडे केली आहे. 

कल्याण : कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्या परिवहन उपक्रमातील (केडीएमटी) अनुकंपा तत्वावरील प्रतीक्षा यादीवरील असलेल्या उमेदवारांना जागा रिक्त होई पर्यंत किमान वेतन कायद्यानुसार नेमणूक करा अशी मागणी परिवहन कामगार कर्मचारी संघटना अध्यक्ष आणि नगरसेवक प्रकाश पेणकर यांनी पालिका आयुक्त गोविंद बोडके यांच्याकडे केली आहे. 

कल्याण डोंबिवली महानगर पालिका आयुक्त पदाचा पदभार गोविंद बोडके यांनी घेतल्यानंतर त्यांना भेटण्यासाठी अनेक जण जात असून आज (ता. 6) एप्रिल नगरसेवक प्रकाश पेणकर, श्रेयस समेळ, माजी नगरसेवक रवि पाटील आणि केडीएमटी आणि पालिका कर्मचारी समवेत पालिका आयुक्त गोविंद बोडके यांची भेट घेत समस्या मांडली. 

कल्याण डोंबिवली महानगरपालिका परिवहन उपक्रम (केडीएमटी) मधील अनुकंपा तत्वावरील प्रतीक्षा यादीवरील असलेल्या उमेदवारांना जागा रिक्त होइपर्यंत किमान वेतन कायद्यानुसार नेमणूक देणे बाबत मागणी यावेळी आयुक्तांकडे करण्यात आली, मयत कामगारांच्या कुटुंबास उदरनिर्वाहासाठी साधन होऊन एक मदत होईल. अशा विविध समस्या आयुक्त गोविंद बोडके यांच्याकडे परिवहन कामगार कर्मचारी संघटना अध्यक्ष आणि नगरसेवक प्रकाश पेणकर यांनी मांडली, यावेळी केडीएमटी बाबत गुरुवारी (ता. 12) सायंकाळी 6 वाजता संघटना आणि अधिकारी सोबत बैठक घेऊन समस्यां  सोडविण्याचे आश्वासन पालिका आयुक्त गोविंद बोडके यांनी दिले असून गुरुवारी (ता. 12) बैठक मध्ये काय निर्णय लागतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

विविध संघटना, नगरसेवक, पदाधिकारी भेट घेत असून मी ही समस्या जाणून घेत आहे, गुरुवारी (ता. 12) केडीएमटी विषयी आढावा बैठक घेऊन समस्या जाणून तोडगा काढण्यासाठी प्रयत्न केला जाईल अशी माहिती पालिका आयुक्त गोविंद बोडके यांनी दिली. 

आज पालिका आयुक्त गोविंद बोडके यांची भेट घेतली, विविध समस्या मांडल्या, आज वेळ नसल्याने  गुरुवारी (ता. 12) सायंकाळी 6 वाजता आयुक्तानी वेळ दिला असून त्यात विविध समस्या मांडू अशी माहिती परिवहन कामगार कर्मचारी संघटना अध्यक्ष आणि नगरसेवक प्रकाश पेणकर यांनी दिली. 

Web Title: Appoint a minimum wage of candidates for Compassionate Principle