सरकारी कर्मचाऱ्यांना सेवेत समाविष्ट करा; कामगार संघटनेची मागणी

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 14 May 2020

महापालिकेच्या आरोग्य विभागातील मनुष्यबळ अपुरे आहे. कोरोनामुळे त्यांच्यावर कामाचा जास्त ताण पडत त्यामुळे राज्य आणि केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देऊन कोरोनाच्या कामासाठी तैनात करा, अशी मागणी महापालिकेतील कामगार संघटनानी केली आहे. 

मुंबई : महापालिकेच्या आरोग्य विभागातील मनुष्यबळ अपुरे आहे. कोरोनामुळे त्यांच्यावर कामाचा जास्त ताण पडत त्यामुळे राज्य आणि केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देऊन कोरोनाच्या कामासाठी तैनात करा, अशी मागणी महापालिकेतील कामगार संघटनानी केली आहे. 

मोठी बातमी ः नवी मुंबईकरांना दिलासा; रुग्णवाहिकेची समस्या सुटणार

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून, मुंबईला रेड झोन जाहीर करण्यात आले आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागातील डॉक्टर, परिचारिका आणि कामगारांवर कामाचा ताण वाढू लागला असून, त्यांना विश्रांतीची गरज आहे. मुंबईतील 2646 प्रतिबंधित विभागांमध्ये मजूर आणि बेघरांना दररोज अन्न पुरवण्याचे काम महापालिकेचे कामगार, अधिकारी आणि अभियंते करत आहेत, अशी माहिती बृहन्मुंबई म्युनिसिपल इंजिनिअर्स युनियनचे सरचिटणीस यशवंत धुरी यांनी दिली. 

मोठी बातमी ः महाड तालुक्याला दिलासा; रुग्णाच्या संपर्कातील सर्वांचे अहवाल निगेटिव्ह

दरम्यान, मुंबईतील कोरोनाग्रस्तांची वाढती संख्या लक्षात घेता पालिकेच्या आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांवर मोठा ताण वाढला आहे. त्यामुळे राज्य व केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना कोरोनाविरोधी मोहिमेत सहभागी करून घ्यावे, अशी मागणी त्यांनी राज्य सरकारकडे केली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: appoint other government employees in corona fight