esakal | वसई विकासिनीच्या अध्यक्षपदी चौथ्यांदा नारायण मानकर यांची नियुक्ती
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

वसई विकासिनीच्या अध्यक्षपदी चौथ्यांदा नारायण मानकर यांची नियुक्ती

sakal_logo
By
संदीप पंडित

विरार : वसई (Vasai) तालूक्यातील शैक्षणिक क्षेत्रात नावाजलेला पब्लिक ट्रस्ट (Public Trust) असलेल्या "वसई विकासिनी" संस्थेची 37 वी वार्षिक सर्वसाधारण सभा, वसई भवन(vasai Bhavan), वसई रोड (Vasai Road) पूर्व येथे नुकतीच पार पडली.यावेळी वसई विकासिनीच्या कार्यकारिणी मंडळाच्या अध्यक्षपदी पुन्हा एकदा वसई विरार (Vasai Virar) शहर महापालिकेचे माजी महापौर नारायण मानकर (Narayan Mankar) यांची बहुमताने निवड करण्यात आली. चौथ्यांदा कार्यकारिणी मंडळाच्या अध्यक्ष पदी निवड होण्याचा मान पटकावणारे नारायण मानकर हे संस्थेच्या इतिहासात पहिलेच ठरले आहेत.

बांद्राच्या पुढे एकमेव दृक कला माहाविद्यालय या संस्थेचे असून यातून अनेक चित्रकार,शिक्षक,शिल्पकार आता पर्यबत तयार झाले आहेत नुकतेच निधन झालेल्या रॉबी डिसिल्व्हा यांनी हे महाविद्यालय उभे करण्यास पुढाकार घेतला होता.या सभेत वसई विकासिनीचे विश्वस्त प्रमुख के.ओ.देवसी, नारायण मानकर, कार्याध्यक्ष शिरीष पाठारे, सरचिटणीस विजय वर्तक , संयुक्त चिटणीस जयंत देसले, हेमंत राऊत,अजय उसनकर व्यासपीठावर उपस्थित होते . मानकर यांनी स्वतः माजी कार्याध्यक्ष भरत दोशी यांचं नावं अध्यक्ष पदासाठी सुचविले होते, परंतु भरत दोशी यांच्या सह सर्वच उपस्थितांनी पुन्हा एकदा मानकर यांनीच कार्यकारणी मंडळाचे अध्यक्ष पद भूषविण्याचा आग्रह धरला व तो त्यांनी मान्य केला.

हेही वाचा: कराडांच्या निवडीनंतर जल्लोष केल्याने कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

अध्यक्षपदी झालेल्या निवडीनंतर बोलताना मानकर यांनी संस्थेच्या आणखीन दोन इमारती लवरच बांधण्याचे सूतोवाच केले. तसेच यावेळी विविध विषयांना मंजुरी देण्यात आली. याप्रसंगी विश्वस्त प्रभाकर घरत ,मनीषा जाधव, उमेश नाईक, प्रकाश वनमाळी, माजी संयुक्त चिटणीस नरेंद्र एच. पाटील, दिलीप डाबरे, राजेश राऊत, सिरेजो आदी उपस्तित होते.

loading image
go to top