मेट्रो 7, मेट्रो 2 अ मार्गिकेवरील सुरक्षेसाठी खासगी एजन्सीची नियुक्ती, तीन वर्षांसाठी 'इतक्या' कोटींचा खर्च

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 23 June 2020

अंधेरी ते दहिसर (मेट्रो 7) आणि दहिसर ते डी. एन. नगर (मेट्रो 2 - अ) या दोन मेट्रो मार्गांवरील सुरक्षाव्यवस्थेसाठी एमएमआरडीएने खासगी कंत्राटदारांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला.

मुंबई :  अंधेरी ते दहिसर (मेट्रो 7) आणि दहिसर ते डी. एन. नगर (मेट्रो 2 - अ) या दोन मेट्रो मार्गांवरील सुरक्षाव्यवस्थेसाठी एमएमआरडीएने खासगी कंत्राटदारांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला. या मार्गांवरील सुरक्षा व्यवस्थेसाठी एमएमआरडीएने निविदा प्रसिध्द केल्या असून तीन वर्षांसाठी साधारणतः 30 कोटी 98 लाख रुपये सुरक्षा व्यवस्थेवर खर्च करावे लागतील, असे अंदाजपत्रक तयार करण्यात आल्याची माहिती मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

BIG NEWS  - पावसाळा आला आजार घेऊन, पावसाळ्यात स्वतःचा आजारांपासून बचाव करण्यासाठीचं संपूर्ण गाईड.. 

पुढील वर्षी अंधेरी ते दहिसर (मेट्रो 7) आणि दहिसर ते डी. एन. नगर (मेट्रो 2 अ) या दोन मार्गांवरील प्रवासी सेवा मे 2021 पर्यंत सुरू करण्याचा एमएमआरडीएचा मानस आहे. त्यानुसार या मार्गिकांच्या संचलनासाठी आवश्यक नियोजन सुरू करण्यात आले आहे.

नक्की वाचा : तब्बल 22 कोटी 70 लाख रुपये खर्चूनही कोरोनाचा नियंत्रणात नाही, मुंबईकर विचारतायत चाललंय काय ?

30 स्थानकांसाठी 163 गार्डसह, 9  पर्यवेक्षकांची आवश्यकता
या प्रकल्पांमध्ये निवृत्त लष्करी अधिकारी, होमगार्ड यांना किंवा किमान दोन वर्षे सुरक्षा रक्षकाचे काम केल्याचा अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जणार आहे. त्यासाठी एमएमआरडीएने शारीरिक निकषही निश्चित केले आहेत. 30 रेल्वे स्थानकांच्या सुरक्षेसाठी 9  पर्यवेक्षक आणि 163 गार्ड नेमले जातील. त्याशिवाय 30 श्वान, त्यांचे 30 हँण्डलर्स आणि 4 पर्यवेक्षकांची नियुक्ती कंत्राटदाराला करावी लागेल. श्वानांच्या वास्तव्यासाठी एमएमआरडीए जागा उपलब्ध करून देणार आहे.

मोठी बातमी - मुंबईनंतर आता नवी मुंबईच्या आयुक्तांची तडकाफडकी बदली...

सुरक्षेसाठी दररोज 2.75 लाखांचा खर्च
134 गार्ड आणि 6 सुपरवायझऱ कायम सुरक्षेसाठी तैनात ठेवावे लागतील. सकाळी 5 ते रात्री 12 या त्यांच्या कामाच्या वेळा असतील. प्रत्येकाला दररोज साडे नऊ तास काम आणि आठवड्यातून दोन सुट्ट्या दिल्या जातील. तसेच, प्रत्येक स्थानकावर एक महिला गार्डही तैनात असेल. चारकोप डेपोच्या सुरक्षेची जबाबदारी 29 गार्ड आणि 3 पर्यपेक्षकांवर असेल. या मार्गांवरील 30 स्थानक आणि एका कारडेपोच्या सुरक्षेसाठी दररोज सुमारे 2 लाख 75 हजार रुपये खर्च होतील, असा अंदाज असल्याचे एमएमआरडीएच्या प्रवक्ताने सांगितले आहे.

Appointment of private agency for safety on Metro 7, Metro 2A line, cost for three years


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Appointment of private agency for safety on Metro 7, Metro 2A line, cost for three years