esakal | तब्बल 22 कोटी 70 लाख रुपये खर्चूनही कोरोनाचा नियंत्रणात नाही, मुंबईकर विचारतायत चाललंय काय ?
sakal

बोलून बातमी शोधा

तब्बल 22 कोटी 70 लाख रुपये खर्चूनही कोरोनाचा नियंत्रणात नाही, मुंबईकर विचारतायत चाललंय काय ?

मुंबईतील 227 नगरसेवकांना नगरसेवक निधीतून प्रत्येकी 10 लाख रुपये कोरोना नियंत्रणासाठी खर्च करण्याची मुभा देण्यात आली.

तब्बल 22 कोटी 70 लाख रुपये खर्चूनही कोरोनाचा नियंत्रणात नाही, मुंबईकर विचारतायत चाललंय काय ?

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मुंबई : मुंबईतील 227 नगरसेवकांना नगरसेवक निधीतून प्रत्येकी 10 लाख रुपये कोरोना नियंत्रणासाठी खर्च करण्याची मुभा देण्यात आली. नगरसेवक निधीचे 22 कोटी 70 लाख रुपये खर्च झाले तरीही कोरोना का वाढतोय असा प्रश्न आता मुंबईकरांना पडू लागलाय. मुंबईच्या उपनगरात कोरोना वाढत चालल्याने वस्त्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

मुंबईच्या पूर्व आणि पश्चिम उपनगरात कोरोना झपाट्याने फ़ैलावत आहे. कोरोना हॉटस्पॉट ठरलेल्या भायखळा, धारावी, वरळी, माटुंगा, वांद्रेसारखे विभागात कोरोना संसर्गाचे प्रमाण कमी झाले आहे. येथे रुग्णांची संख्या  नियंत्रणात आली आहे. मात्र कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी,  मुलुंड, भांडूप, अंधेरी, मालाड, बोरीवली, कांदिवली आणि दहिसर या भागात कोरोना वाढत आहे.  

BIG NEWS - चिंताजनक ! नवी मुंबईतील 'ही' चार ठिकाणं ठरतायेत कोरोनाचे 'हॉटस्पॉट'

दहिसर ते मालाड परिसरात रुग्णांची वाढ सुरूच आहे. यामध्ये कांदिवलीत २०९०, मालाडमध्ये ३३७८, बोरिवली १८२५ आणि दहिसरमध्ये रुग्णांची संख्या १२७४ वर पोहोचली आहे. या चार विभागात रुग्ण दुपटीचा वेग १५ ते २० दिवस आहे. यात दहिसरचा दुपटीचा रेट सर्वाधिक म्हणजे १५ दिवस आहे. 

मोठी बातमी : ठाकरे - पवार यांच्यातली बैठक संपली, एक तास खलबतं... 

झोपडपट्टया, चाळी भागातील नागरिकांना सॅनिटायझर, मास्कचे मोफत वाटप, औषध फवारणी, झोपडपत्यांमध्ये जनजागृती, सार्वजनिक शौचालयांची साफसफाई आदी कामे करण्यासाठी मुंबईतील नगरसेवकांना त्यांच्या 60 लाख रुपये नगरसेवक निधीतून 10 लाख रुपयांची तरतूद केली होती. मात्र त्यातून किती लोकांना ही मदत झाली याबाबत स्थानिक नागरिकांना काहीही माहिती नाही. क्वचित कधीतरी औषध फवारणी करताना कामगार दिसत आहेत. त्यामुळे या निधीचा नेमका विनियोग कुठे झाला? एवढा निधी खर्च होऊन कोरोना नियंत्रणात का येत नाही अशी विचारणा नागरिक करू लागले आहेत. 

around 22 crore 70 lakhs spend on covid19 precaution yet corona is not in control

loading image