डॉक्टरांचं कौतूक करत मुख्यमंत्र्यांनी पालिकेला दिल्या 'या' महत्त्वाच्या सूचना

सकाळ वृत्तसेवा 
रविवार, 24 मे 2020

कोरोनानं मुंबईत थैमान घातलं आहे. मुंबईत कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. मुंबईत कोरोनाग्रस्तांचा डबलिंग रेट 14 दिवसांवर आल्याचं उद्धव ठाकरे यांनी शनिवारी सांगितलं. मुख्यमंत्र्यांनी शनिवारी बीएमसीच्या रूग्णालयातील कर्मचारी आणि डॉक्टरांसी व्हिडिओ कॉन्फर्सिंगद्वारे संवाद साधला. त्यानंतर ट्विट करुन यासंदर्भातली माहिती दिली आहे. 

मुंबई- कोरोनानं मुंबईत थैमान घातलं आहे. मुंबईत कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. मुंबईत कोरोनाग्रस्तांचा डबलिंग रेट 14 दिवसांवर आल्याचं उद्धव ठाकरे यांनी शनिवारी सांगितलं. मुख्यमंत्र्यांनी शनिवारी बीएमसीच्या रूग्णालयातील कर्मचारी आणि डॉक्टरांसी व्हिडिओ कॉन्फर्सिंगद्वारे संवाद साधला. त्यानंतर ट्विट करुन यासंदर्भातली माहिती दिली आहे. 

मोठी बातमी! मुंबईची लाइफलाईन टप्प्याटप्प्याने लवकरच सुरू होणार?

गेल्या दोन महिन्यांपासून कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सतत लढा देणाऱ्या डॉक्टरांचं कौतूक केलं आहे. तसंच आपण लवकरच कोरोनाचा पराभव करु असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. कोरोनाच्या विजयाच्या लढतीत मेडिकल स्टाफचा सिंहाचा वाटा आहे, असंही त्यांनी या व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये म्हटलं आहे. मुंबईत जरी रुग्णांची संख्या वाढत असली तरी मुंबईतील कोरोनाग्रस्तांची संख्या 14 दिवसानंतर दुपटीने वाढत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. 

मुंबईतल्या रूग्णालयात आयसीयू आणि इतर मेडिकल सुविधा वाढवत असल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली. या चिंताग्रस्त परिस्थितीमध्ये कोरोनावर मात करणाऱ्या रूग्णांची होणारी वाढ दिलासादायक आहे. त्यामुळे रिकव्हरी रेटही वाढत असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत म्हटलं आहे. पालिकेनं केंद्रानं दिलेल्या सूचनांचं आणि प्रोटोकॉलचं पालन करत असून येत्या काळात ताप्तुरते रुग्णालय (फिल्ड हॉस्पिटल ) सुरु करण्यावर भर देणार असल्याचंही मुख्यमंत्री म्हणालेत.  

मुंबईकरांना नोकरीची मोठी सुवर्णसंधी; जाणून घ्या अधिक माहिती 

केंद्र सरकारनं दिलेल्या सूचनांकडे लक्ष असून त्यामुळे कोरोनाशी लढण्यास मदत होत असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. या रोगाशी निगडीत मेडिकल कंस्ट्रक्शनवरील नियंत्रण आता व्यवस्थित कंट्रोल रूमद्वारे केलं जाणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. 

कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. हा आकडा पाहता जास्तीत जास्त आयसीयू आणि आयसोलेशन सेंटर वाढवण्यात आलेत. आपण लवकरच कोरोनावर नियंत्रण मिळवू असा विश्वास मुख्यमंत्री बोलून दाखवला आहे. आयसीयू आणि आयसोलेशन सेंटरचा वापर करण्याची गरज लागू नये, असंही त्यांनी म्हटलं आहे.

मुंबईच्या अनेक ठिकाणी अतिदक्षता विभाग आणि आयसोलेशन बेडची व्यवस्था बीएमसीने केली. मुंबईची परिस्थिती पाहता लवकरच पावसाचं आगमन होईल. त्यामुळे पावसाच्या परिस्थितीत मुंबईत डेंग्यू, लेप्टो आणि इतर रोगांचीही साथ येते. त्यामुळे कोरोनासोबत इतर रोगांवर नियंत्रण मिळवण्यासाठी पालिकेकडून तयारी करण्यात यावी, अशा सूचनाही यावेळी मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

तुम्हाला पाहून मला खूप उत्साह येतो.. जेव्हा कोरोना व्हायरसचा लढा संपेल तेव्हा तुम्ही या विजयाचे खरे शिल्पकार असाल, असंही मुख्यमंत्री म्हणालेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Appreciating the doctors, the Chief Minister gave important instructions to the municipality