esakal | नवी मुंबईतील ३३ कोटींच्या विकासकांमाना मंजुरी
sakal

बोलून बातमी शोधा

नवी मुंबईतील ३३ कोटींच्या विकासकांमाना मंजुरी

नवी मुंबई महापालिकेच्या शुक्रवारी (ता.२४) झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत ३३ कोटींच्या विकासकांमाना मंजुरी देण्यात आली. १८ जानेवारी रोजी होणारी स्थायी समितीची बैठक ही अपरिहार्य कारणास्तव रद्द करण्यात आली होती. ही स्थायी समितीची बैठक शुक्रवारी पार पडली.

नवी मुंबईतील ३३ कोटींच्या विकासकांमाना मंजुरी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेच्या शुक्रवारी (ता.२४) झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत ३३ कोटींच्या विकासकांमाना मंजुरी देण्यात आली. १८ जानेवारी रोजी होणारी स्थायी समितीची बैठक ही अपरिहार्य कारणास्तव रद्द करण्यात आली होती. ही स्थायी समितीची बैठक शुक्रवारी पार पडली. या वेळी दोन्ही स्थायी समितीच्या बैठकीत प्रस्ताव मंजुरीसाठी पटलावर आले असता, बहुमताने विकासकामांच्या प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली. 

ही बातमी वाचली का? कांद्याचे दर आजही चढेच, ही आहे कारणे...

शिरवणे सेक्‍टर- १ येथील ठाणे-बेलापूर मार्ग ते पंपहाऊसपर्यंत मलनिःसारण वाहिनी बदलणे, कोपरी गाव सेक्‍टर- २६ येथील स्मशानभूमीजवळील उड्डाणपूल ते पुनित कॉर्नर इमारतीपर्यंत रस्त्यांचे काँक्रीटीकरण, वाशी रेल्वेस्थानकालगत डांबरी रस्ता, ऐरोली सेक्‍टर- १४ येथील मुख्य नाल्याचे आरसीसी पद्धतीने बांधकाम करणे, ऐरोली सेक्‍टर- ८ व ८- ए मधील रस्ते, गटार व पदपथांची दुरुस्ती करणे, वाशी सेक्‍टर- १७ येथील नवरत्न हॉल ते मानसरोवर सोसायटीपर्यंत आरसीसी गटार बांधणे, ऐरोली सेक्‍टर- १९ मधील भूखंड क्रमांक ३७ पर्यंत गटार व पदपथांची सुधारणा, घणसोली नोडमधील सेक्‍टर- ४ पाम बीच रोड ते कारगील मैदानपर्यंतच्या पदपथावर दिवाबत्तीची सोय करणे, कोपरखैरणे येथील श्रमिकनगरमधील आंबेडकर आवास योजनेंतर्गत घरकुल इमारतीची दुरुस्ती करणे या कामांना मंजुरी देण्यात आली.

ही बातमी वाचली का? या कारणामुळे पतीने केले पत्नीवर सपासप वार..

घणसोली विभागातील संत ज्ञानेश्वर चौक ते रबाळे स्थानकासमोरील मुख्य रस्त्यापर्यंतची थीन व्हाईट टॅपिंग पद्धतीने दुरुस्ती करणे. नेरूळ विभागातील शिरवणे सेक्‍टर- १ येथील सेंट्रल स्टोअर ते महिंद्रा ऑटो शोरूमपर्यंत काँक्रीट रस्ता बांधणे, ऐरोली विभागातील चिंचपाडा येथील गटारांची सुधारणा, कोपरखैरणेमधील वैकुंठधाम स्मशानभूमीची दुरुस्ती, वाशी सेक्‍टर- १५ येथील रस्त्यांचे डांबरीकरण, पालिकेच्या विविध विभागांकरिता ४ नवीन महिंद्रा बोलेरो जीप खरेदी करण्याच्या विकासकामांना या बैठकीत मंजुरी देण्यात आली.

loading image
go to top