...या कारणामुळे पतीने केले पत्नीवर सपासप वार

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 24 जानेवारी 2020

अनैतिक संबंधाच्या संशयाने घेतला पत्नीचा बळी

मुंबई : कुर्ला येथील विनोबा भावेनगर परिसरात पतीने घरातील चाकूने वार करून पत्नीची हत्या केल्याची घटना गुरुवारी (ता. 23) घडली. या प्रकरणी पतीला अटक केली असून, अधिक तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

महत्वाची बातमी जाणून घ्या कसं केलं जातं 'फोन टॅपिंग' किंवा 'स्नूपिंग'

दिनेश इंगळे (35) असे अटक केलेल्या पतीचे नाव असून, त्याने केलेल्या चाकूहल्ल्यात पत्नी शीतल इंगळे (29) हिचा मृत्यू झाला. लग्नाला अनेक वर्षे झालेल्या या दाम्पत्याला दोन मुले आहेत. विनोबा भावे नगर परिसरातील ख्रिश्‍चन गावात राहणारा दिनेश वाहनचालक आहे. याच परिसरात राहणाऱ्या एका तरुणाशी शीतलचे अनैतिक संबंध असल्याचा त्याला संशय होता. त्यावरून दोघांमध्ये सतत वाद होत असत.

मोठी बातमी "राज ठाकरे यांच्या हिंदुत्वामागे शरद पवार यांचं डोकं"

काही दिवसांपूर्वी शीतल हरवल्याची तक्रार दिनेशने विनोबा भावे नगर पोलिस ठाण्यात केली होती. पोलिसांनी तिला शोधून परत आणले. त्यानंतरही या दाम्पत्यात भांडणे सुरूच होती. गुरुवारी सकाळी पुन्हा वाद झाल्यावर संतापलेल्या दिनेशने घरातील चाकूने शीतलवर वार केले. पोटावर आणि चेहऱ्यावर चाकूचे वार झाल्याने शीतल रक्ताच्या थारोळ्यात पडली.

हे सुद्धा वाचा पत्नीला घरात परपुरुषासोबत पाहिलं; अन्...त्याचाच झाला गेम..

तिच्या ओरडण्यामुळे धावून आलेल्या शेजाऱ्यांनी पळून जाणाऱ्या दिनेशला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. जवळच्या रुग्णालयात दाखल केलेल्या शीतलचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. पोलिसांनी अटक केली असून, अधिक तपास सुरू आहे.

Wife murdered by husband at Kurla


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Wife murdered by husband at Kurla