कांद्याचे दर आजही चढेच, ही आहे कारणे

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 24 जानेवारी 2020

मुंबई : कांद्याचे भाव पुन्हा भडकले आहेत. घाऊक बाजारात प्रतिकिलो 50 रुपये भाव असलेला कांदा किरकोळ बाजारात 70 रुपयांना विकला जात आहे. व्यापारी व शेतकऱ्यांनी चांगल्या दर्जाचा कांदा साठवून ठेवल्यामुळे कांद्याचे भाव अजून आटोक्‍यात येत नसल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.

मोठी बातमी "राज ठाकरे यांच्या हिंदुत्वामागे शरद पवार यांचं डोकं"

अवकाळी पावसामुळे गेल्या वर्षी कांद्याच्या पिकाचे मोठे नुकसान झाले. त्यातच नवा कांदा उशिरा बाजारात आला. त्यामुळे कांदा किरकोळ बाजारात तब्बल दीडशे रुपयांवर गेला होता. त्यानंतर भाव कमी झाले असले, तरी ते पन्नाशीवरच राहिले. गेल्या आठवड्यात एक किलो कांदा घाऊक बाजारात 40 रुपये; तर किरकोळ बाजारात 60 रुपयांना विकला जात होता. या आठवड्यात किरकोळ बाजारात एक किलो कांद्यासाठी 70 रुपये मोजावे लागत आहेत. त्यातच बाजारात आलेला कांदा द्वितीय श्रेणीतील आहे.

हे सुद्धा वाचा जाणून घ्या कसं केलं जातं 'फोन टॅपिंग' किंवा 'स्नूपिंग'

व्यापारी आणि शेतकऱ्यांनी प्रथम श्रेणीच्या कांद्याची साठवणूक केल्यामुळे भाव खाली उतरत नाहीत, असे भायखळा भाजी मंडईचे अध्यक्ष किरण झोडगे यांनी सांगितले. पुढील पावसाळ्यासाठी व्यापाऱ्यांनी आतापासूनच कांदा साठवण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे मागणीनुसार कांद्याचा पुरवठा होत नसल्याने भाव चढेच राहतात. मार्चमध्ये नवीन कांदा बाजारात येण्याची शक्‍यता आहे. तोपर्यंत कांदा वधारलेलाच राहण्याची शक्‍यता आहे. 

हे वाचलेय का... पत्नीला घरात परपुरुषासोबत पाहिलं; अन्...त्याचाच झाला गेम..

व्यापारी, शेतकरी चांगल्या दर्जाच्या कांद्याची साठवणूक करत आहेत. त्यामुळे कांद्याचे भाव कमी होत नाहीत. राज्य सरकारने कांद्याच्या साठवणुकीवर निर्बंध घालावेत, तरच कांद्याचे भाव आटोक्‍यात येतील. 
- किरण झोडगे,
अध्यक्ष, भायखळा भाजी मंडई

Onion is expensive due to storage

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Onion is expensive due to storage