बांधकाम साहित्याचा पुनर्चक्रीकरण प्रकल्प मार्गी

बांधकाम साहित्याचा पुनर्चक्रीकरण प्रकल्प मार्गी


कल्याण : घनकचरा व्यवस्थापनाच्या विषयात सपशेल अपयशी ठरलेल्या कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने आता कत्तलखान्यातील सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी प्रकल्प उभारण्याचे निश्‍चित केले आहे. यासाठी एक कोटी ६५ लाख रुपये 
खर्च अपेक्षित आहे. याशिवाय शहरातील डेब्रिजमधून वस्तूंची पुनर्चक्रीकरण करण्याच्या प्रकल्पालाही धोरणात्मक मंजुरी देण्यात आली आहे. 
आता हे प्रकल्प पुढे कसे कार्यान्वित केले जाणार हे पाहणे औत्सुक्‍याचे असणार आहे. पालिकेच्या आज झालेल्या सर्वसाधारण सभेत या दोन्ही विषयांना मंजुरी देण्यात आली आहे.
केंद्राच्या पर्यावरण, वने व हवामान बदल विभागामार्फत बांधकाम व निष्कासन कचरा व्यवस्थापन २०१६ अंतर्गत देशभरात नवीन नियमावली तयार करण्यात आली आहे. या नव्या नियमावलीअंतर्गत बांधकाम साहित्याचे निष्कासन करणे, त्याची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी स्थानिक स्वराज्य संस्थांवर निश्‍चित करण्यात आली आहे. यासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून ५८ टक्के निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. ४२ टक्के निधी हा स्थानिक स्वराज्य संस्थांनी उभा करणे अपेक्षित आहे. हा प्रकल्प सार्वजनिक खासगी भागीदारी (पीपीपी) तत्त्वावर राबवला जाणे अपेक्षित आहे. या प्रकल्पासाठी महापालिकेला संबंधित ठेकेदाराला पाच एकरची जागा १० ते २० वर्षे या करारावर देण्याची जबाबदारी निश्‍चित करण्यात आली आहे.

ही बातमी वाचा ः पाचशे स्क्वेअर फुटांच्या घरांना मालमत्ता कर माफ
कत्तलखान्यातील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाला मंजुरी कल्याणमधील कृषी उत्पन्न बाजार समितीलगत असलेल्या कत्तलखान्यातून सोडले जाणारे सांडपाणी थेट खाडीत मिसळत असल्याने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने पालिकेला कारवाई का केली जाऊ नये अशी विचारणा केली होती. या सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याचा प्रकल्प अहवाल तयार असल्यामुळे मंडळाने कोणतीही कारवाई केली नाही. एक कोटी ६५ लाख रुपये खर्चाच्या या प्रकल्पास आज मंजुरी देण्यात आली. या प्रकल्पातील पाणी ज्या नाल्याद्वारे सोडले जाणार आहे, त्या नाल्याच्या दोन्ही बाजूंना संरक्षक भिंतीचे काम टप्प्याटप्प्याने होत असल्याची माहिती या वेळी पालिका प्रशासनाने दिली.
 

पालिकेत तू-तू मैं-मैं
अधिकाऱ्यांना सेवेत पुन्हा सामावून घेण्याबाबतचा विषय आज सभेत मांडण्यात आला.यावेळी विरोधी पक्षनेता राहुल दामले यांनी निवृत्त अधिकारी प्रमोद कुलकर्णी यांचा प्रस्तावही पुढील महासभेत सादर करावा, अशी विनंती पीठासीन अधिकाऱ्यांना केली. यावर आक्षेप घेत शिवसेनेचे नगरसेवक मल्लेश शेट्टी यांनी जातिवाचक शब्दांचा वापर केल्याने दामले यांनी तीव्र आक्षेप नोंदवला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com