मुंबई विद्यापीठाचा अर्थसंकल्प मंजूर 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 17 मार्च 2017

मुंबई - मुंबई विद्यापीठाचा 2017-18 चा अर्थसंकल्प गुरुवारी मंजूर झाला. 539 कोटी चार लाखांचा हा संकल्प आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत ही रक्कम कमी आहे. गतवर्षी 639 कोटी 25 लाखांचा निधी मुंबई विद्यापीठाने मंजूर केला होता. 

मुंबई - मुंबई विद्यापीठाचा 2017-18 चा अर्थसंकल्प गुरुवारी मंजूर झाला. 539 कोटी चार लाखांचा हा संकल्प आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत ही रक्कम कमी आहे. गतवर्षी 639 कोटी 25 लाखांचा निधी मुंबई विद्यापीठाने मंजूर केला होता. 

गेल्या अर्थसंकल्पातील बहुतांश सुविधा अपूर्ण राहिल्याने यंदा त्यावरच जास्त भर राहील. यंदा कालिना संकुलाचा चेहरामोहरा बदलणारा मास्टर प्लान जाहीर झाला आहे. त्यासाठी एक कोटी मंजूर झाले आहेत. झी-झियान लीन सेंटर ऑफ इंडिया- चायना स्टडीज, सेंटर फॉर युरोपियन स्टडीज आदी नव्या घोषणा करण्यात आल्या आहेत. त्यापैकी झी-झियान लीन सेंटर ऑफ इंडिया- चायना स्टडीजला 50 लाख, सेंटर फॉर युरोपियन स्टडीजला 15 लाख रुपये मंजूर झाले आहेत. एकेरी पालकत्व स्वीकारलेल्या मातांच्या मुलांना व हुतात्म्यांच्या मुलांना पदव्युत्तर शिक्षण मोफत दिले जाईल. 

पालघर जिल्ह्याच्या विकासासाठी 200 एकर जमीन, कळव्यात 14 एकर जमिनीवर कौशल्य विकास केंद्र, एमपीएससी, युपीएससी कोर्सेस, रत्नागिरीत सेंटर फॉर रेल्वे रिसर्च हे प्रकल्प यंदापासून सुरू होत आहेत. कल्याणमध्ये स्कूल ऑफ इंजिनिअरिंग सायन्स ही संस्था सुरू होत आहे. गतवर्षीच्याच बहुतांश तरतुदी यंदाच्या अर्थसंकल्पात आहेत. त्यात चार नवी वसतिगृहे, कर्मचारी वसाहत, बोटॅनिकल गार्डन, कौशल्य विकास केंद्र, खारफुटीचे संवर्धन आदींचा मुख्यत्वे समावेश आहे. 

Web Title: Approved the budget of the University of Mumbai