'या' दिवसांपासून सुरु होणार एसटी महामंडळाच्या स्मार्ट कार्ड योजनेची नोंदणी

प्रशांत कांबळे
Thursday, 28 January 2021

ज्या ज्येष्ठ नागरिकांचे स्मार्ट कार्ड नोंदणी झाली नसेल अशांना 1 एप्रिलनंतर स्मार्ट कार्ड नोंदणी करता येणार आहे.

मुंबई:  कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाच्या स्मार्ट कार्ड  योजनेला यापूर्वी 30 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. त्यानंतर पुन्हा चार महिन्याची म्हणजेच 31 मार्च पर्यंत मुदतवाढ दिली होती. मात्र, आता ज्या ज्येष्ठ नागरिकांचे स्मार्ट कार्ड नोंदणी झाली नसेल अशांना 1 एप्रिलनंतर स्मार्ट कार्ड नोंदणी करता येणार आहे. तर ज्यांची नोंदणी झाली त्यांना स्मार्ट कार्ड स्विकारता येणार आहे.

राज्य शासन एसटी महामंडळाच्या माध्यमातून सुमारे 27 विविध सामाजिक घटकांना 33 ते 100 टक्क्यांपर्यंत प्रवासी भाड्यामध्ये सवलत देते. या सवलत योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित लाभार्थींना आधार क्रमांकाशी निगडीत असलेल्या स्मार्ट कार्ड काढण्याची योजना एसटीने सुरू केली आहे. त्यानुसार एसटीच्या प्रत्येक आगारामध्ये ज्येष्ठ नागरिक आणि अन्य सवलत धारकांना स्मार्ट कार्ड देण्याची प्रक्रिया सुरू आहे. मात्र कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीमुळे प्रवाशांना आगारात येऊन स्मार्टकार्ड घेणे शक्य होत नव्हते.

मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

त्यामुळे ज्या प्रवाशांची नोंदणी किंवा स्मार्ट कार्ड मिळाले नसतील त्यांना  31 मार्च नंतरही नोंदणी करता येणार आहे. तर स्मार्ट कार्ड प्राप्त करून घेता येणार असून, यादरम्यान ज्या मार्गावर एसटी बसेस सुरू आहे. त्या मार्गावरील प्रवाशांना सवलतीचा लाभ घेता येणार आहे.

हेही वाचा- Corona Vaccine Centre: मुंबईत लवकरच आणखी 25 लसीकरण केंद्र
 
सध्या प्रचलित पद्धतीनेच ज्येष्ठांना सवलत

स्मार्ट कार्ड योजना अद्याप राज्यात पूर्णपणे कार्यान्वित नाही. त्यामध्येच ज्येष्ठ नागरिकांची संख्या सर्वात जास्त आहे. त्यामुळे ज्या ज्येष्ठ नागरिक प्रवाशांनी नोंद केली नसेल त्या प्रवाशांना महामंडळातील प्रचलित पद्धत म्हणजेच ज्येष्ठ नागरिकांचे ओळखपत्र किंवा आधारकार्ड, मतदान कार्ड बघून  ज्येष्ठ नागरिकांना एसटीच्या प्रवासात सवलत मिळवता येणार आहे.

-------------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

April 1St Registration smart card scheme starts


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: April 1St Registration smart card scheme starts