एप्रिल महिन्यातच टंचाईच्या झळा!

सिद्धेश्‍वर डुकरे
गुरुवार, 19 एप्रिल 2018

मुंबई - मॉन्सून गेल्यावर्षी चांगला झाला असला तरी यंदा एप्रिल महिन्यात राज्यात टंचाईच्या झळा जाणवत आहेत. ४६० गावे आणि २४७ वाड्यांवर सध्या ६७० टॅंकर सुरू आहेत. सर्वांत जास्त टॅंकर औरंगाबाद विभागात (३९६) आहेत. जलाशयांतील साठा आदल्या वर्षीच्या तुलनेत (२०१७ च्या) जास्त असला तरीही तो जेमतेम ३५.३९ टक्‍के खाली आहे. सर्वांत कमी १७.८७ टक्‍के साठा नागपूर विभागात आहे.

राज्यात गेल्यावर्षी चांगल्या पावसाची नोंद झाल्याने सर्व प्रकारचे जलाशय भरले होते. मात्र, एप्रिलमध्येच ही टंचाई निर्माण झाली असून, औरंगाबाद विभागात टॅंकरची संख्या दर आठवड्याला वाढत आहे. सर्वांत कमी टॅंकर पुणे विभागातील सातारा जिल्ह्यात (४) सुरू आहेत. 

४६० - गावे
२४७ - वाड्या
६७० - टॅंकर 

५६२ - राज्यातील खासगी टॅंकरची संख्या
109 - राज्यातील सरकारी टॅंकरची संख्या
३९६ - सर्वांत जास्त टॅंकर औरंगाबाद जिल्ह्यात 

३५.३९ टक्‍के जलाशयांतील सध्याचा साठा
२८.८९ टक्‍के जलाशयांतील गेल्यावर्षीचा साठा

Web Title: april month water shortage