
भाजपची अधिकृत प्रवक्ता म्हणून माध्यमांमध्ये पक्षाची बाजू आक्रमकपणे मांडणाऱ्या महिलेची मुंबई उच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून नियुक्ती झालीय. आरती साठे असं महिला न्यायाधीशांचं नाव आहे. एका पक्षाची अधिकृत प्रवक्ता म्हणून काम केल्यानंतर न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाल्यानं उलट सुलट प्रश्न विचारले जात आहेत. दरम्यान, आरती साठे यांनी २०२४ मध्येच भाजपमधील पदाचा राजीनामा दिल्याचं सांगण्यात येतंय. आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते रोहित पवार यावर प्रश्न उपस्थित केले आहेत.