सट्टाप्रकरणी अरबाझ खानने दिली कबुली

 किशोर कोकणे
शनिवार, 2 जून 2018

ठाणे : गेल्या पाच ते सहा वर्षांपासून अभिनेता अरबाझ खान राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांमध्ये सट्टा खेळत होता. अनेकदा अरबाझ खान सट्टा खेळताना पैसेही जिंकला होता. मात्र आपण किती रुपयांचा सट्टा खेळलो हे अरबाझला अाठवत नसल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप शर्मा त्याची चौकशी करत आहेत. त्याने सट्टा खेळत असल्याची कबुलीही दिली आहे. घरच्यांनाही तो सट्टा खेळत असल्याची माहिती होती. घरच्यांना त्याचा विरोध होता. अरबाझ खान आणि त्याची विभक्त झालेली पत्नी मलाईका अरोरा-खान यांच्यात तो खेळत असलेल्या सट्टेबाजी वरून वाद होत असत. त्यामुळे त्या दोघांतील घटस्फोटाचे सट्टेबाजी हे देखील कारण असल्याचे सांगण्यात येत आहे.

Web Title: Arbaaz Khan confesses to involvement in betting during IPL