उल्हासनगरातील आर्किटेक्ट असोसिएशनचा निवडणुकीवर बहिष्का

दिनेश गोगी
सोमवार, 11 जून 2018

उल्हासनगर - गेल्या चार पाच वर्षांपासून पालिकेच्या वतीने परवण्यांचे नूतनीकरण केले जात नसल्याच्या निषेधार्थ उल्हासनगरातील आर्किटेक्ट असोसिएशनने येत्या 25 जून रोजी होणाऱ्या पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. असोसिएशनचे अध्यक्ष अमर जग्यासी यांनी ही माहिती दिली.

उल्हासनगर - गेल्या चार पाच वर्षांपासून पालिकेच्या वतीने परवण्यांचे नूतनीकरण केले जात नसल्याच्या निषेधार्थ उल्हासनगरातील आर्किटेक्ट असोसिएशनने येत्या 25 जून रोजी होणाऱ्या पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. असोसिएशनचे अध्यक्ष अमर जग्यासी यांनी ही माहिती दिली.

बांधकामात अनियमितता, वाढीव चटई क्षेत्र असा ठपका ठेवून उल्हासनगर मधील आर्किटेक्ट अर्थात वास्तुविशारद यांच्या परवण्यांचे नूतनीकरण करण्याचे काम गेल्या चार पाच वर्षांपासून पालिकेने थांबवले आहे. आर्किटेक्ट पालिकेच्या नगररचना विभागाकडे बांधकामांचा नकाशा सादर करतात.सर्व खात्री केल्यावर त्यास मंजुरी मिळते. अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली इमारत किंबहूना बंगला उभा राहतो. मात्र कामात अनियमितता आणि वाढीव चटई क्षेत्राचा ठपका केवळ आर्किटेक्ट यांच्यावरच ठेवला जात असून अधिकाऱ्यांना मात्र मोकळीक दिली जाते. असा आरोप अमर जग्यासी यांनी व्यक्त करून परवण्यांच्या नुतनीकरणची प्रक्रिया नाहक थांबवण्यात येत असल्याची खंत व्यक्त केली.

पूर्वी परन्यांचे नुतनीकरण हे नगररचनाकार करत होते. आता मात्र तत्कालीन आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनी त्यांच्या बदली पूर्वी नुतनिकरणाचा अधिकार आयुक्तांकडे ठेवला आहे असेही त्यांनी सांगितले.

उल्हासनगरात 15 ते 20 आर्किटेक्ट असून त्यांच्याशी संबंधित इंजिनिअर कार्यालयीन कर्मचारी बिल्डर आणि सर्वांचे कुटुंबातील सदस्य हे सर्व उच्चशिक्षित आहेत. परवाण्यांच्या नुतनिकरणा अभावी गेल्या दोन वर्षांपासून सर्व कारभार ठप्प पडला आहे.ज्या आर्किटेक्ट मुळे पालिकेला कोट्यवधीचा महसूल मिळतो,त्या आर्किटेक्ट कडे दुर्लक्ष केले जात असल्याने असोसिएशन ऑफ आर्किटेक्ट अँड इंजिनिअरचे मुलचंद सोनेसर,लक्ष्मण कटारिया,भूषण रूपानी,अतुल देशमुख,कमलेश सुतार,राजेंद्र सावंत,प्रकाश वाधवरा,राजेंद्र सिंग,समीर जाधव,दिलीप शर्मा,दुर्गा राय आदी सर्व पदाधिकाऱ्यांनी कोकण पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.तसे ट्विट भाजपा उमेदवार निरंजन डावखरे यांना करण्यात आले आहे.असे अमर जग्यासी यांनी स्पष्ट केले.

यासंदर्भात आयुक्त गणेश पाटील व मुख्यालय उपायुक्त संतोष देहरकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांचे मोबाईल नॉट रिचेबल मिळत असल्याने त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही.

कोकण पदवीधर मतदार संघात शिवसेनेचे संजय मोरे आणि राष्ट्रवादीतून भाजपात कोलांटउडी घेणारे निरंजन डावखरे यांच्यात अटीतटीची निवडणूक होणार आहे.

Web Title: Archaeologist Association of Ulhasangan ex-boycott on election