
डी-कंपनीशी संबंधित आरोपी म्हणाले, 'सारे जहां से अच्छा, हिंदोस्तां हमारा'
मुंबई : घातपाताच्या संशयावरून आणि डी-कंपनीसंबंधित (D-Company) मनी लाँड्रिंगप्रकरणी (Money Laundering) अटक करण्यात आलेल्या दोघांना न्यायालयाने 20 मे पर्यंत एनआयएची (NIA) कोठडी सुनावली आहे. दरम्यान, ज्यावेळी या आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले त्यावेळी आम्ही काहीही केले नसून, आमचेही देशावर खूप प्रेम असल्याचे सांगित 'सारे जहाँ से अच्छा हिंदोस्तान हमारा' असे उद्घार काढले. (NIA Arrested Two Suspected In D-Company Money Laundering Case )
आरिफ अबुबकर शेख आणि शब्बीर अबुबकर शेख असे अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. डी-कंपनी अनेक दहशतवादी संघटनांच्या (Terrorist ) संपर्कात असून देशात मोठा दहशतवादी कट रचण्याच्या तयारीत असल्याचे एनआयएने न्यायालयात सांगितले. अटक आरोपींना डी-कंपनीसाठी मनी लाँड्रिंग केल्याप्रकरणी अटक करण्यात आली असून, या प्रकरणात तपासादरम्यान, अनेक संशयास्पद व्यवहारांचे पुरावे मिळाल्याचेही एनआयएने म्हटले आहे.
हेही वाचा: अडवाणींवर कोणती कारवाई केली?; औरंगजेब कबर प्रकरणी काँग्रेसचा सवाल
अटक करण्यात आलेले आरोपी 1993 च्या बॉम्बस्फोटातील आरोपी छोटा शकीलच्या संपर्कात असून त्यांच्यामार्फत डी-कंपनीसाठी पैसे पाठवल्याचेही तपासात समोर आले आहे. तपासादरम्यान, आरोपींचे असे अनेक व्यवहार आढळून आले आहेत, ज्यामध्ये डी-कंपनीने त्यांना हवालाद्वारे पैसे पाठवले आहेत. त्याशिवाय तपासादरम्यान असे अनेक ठोस पुरावे मिळाले आहेत, ज्यातून अटक केलेले दोन्ही आरोपी डी-कंपनीच्या पे रोलवर होते आणि ते डी-कंपनीसाठी काम करत होते.
'सारे जहाँ से अच्छा, हिंदुस्थान हमारा'
न्यायमूर्ती राहुल भोसले यांनी आरोपींना त्यांच्यावरील आरोपांवर काय म्हणायचे आहे, अशी विचारणा केली. त्यावर आरोपींनी आपल्यावर लावलेले सर्व आरोप खोटे असल्याचे सांगितले. तसेच यावेळी त्यांनी 'सारे जहाँ से अच्छा, हिंदुस्थान हमारा' असं म्हणत आपलेही देशावर प्रेम असल्याची भावना व्यक्त केली.
Web Title: Arif Abubakar Shaikh Shabbir Abubakar Shaikh Suspects In D Company Case Sent To Nia Custody
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..