

Arif Pathan Kalyan Crime
ESakal
कल्याण : कल्याण येथे खळबळजनक घटना घडल्याचे समोर आले आहे. कुख्यात ड्रग्स तस्कर अमजद पठाण याच्या घरातून कोट्यवधी रुपयांचे ड्रग्स जप्त झाल्याच्या प्रकरणात अमजद पठाण हा त्याच्या साथीदारांसह सध्या तुरुंगात आहे. मात्र, त्यानंतर आता त्याचा मुलगा आरिफ पठाण याच्यावर कल्याण पश्चिमेतील बैल बाजार परिसरात दहशत निर्माण केल्याचा आरोप होत आहे. त्याने एका विद्यार्थ्यावर तलवारीने हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.