अरे व्वा ! ठाण्याच्या मधुरिका पाटकर हिला अर्जुन पुरस्कार जाहीर

शर्मिला वाळुंज
Saturday, 29 August 2020

राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांची यादी नुकतीच जाहीर करण्यात आली असून ठाण्याची टेबल टेनिस खेळाडू मधुरिका पाटकर हिला अर्जुन पुरस्कार जाहीर झाला आहे. या यशामुळे मधुरिका पाटकरवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. 

ठाणे, ः राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांची यादी नुकतीच जाहीर करण्यात आली असून ठाण्याची टेबल टेनिस खेळाडू माधुरिका पाटकर हिला अर्जुन पुरस्कार जाहीर झाला आहे. या यशामुळे मधुरिका पाटकरवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. 

मुंबईकरांनो सावधान! कोरोना नियंत्रणात आला असला तरी हायरिस्कमधील रुग्णांच्या संख्येत होतेय मोठी वाढ
राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्ताने राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांचं वितरण केल जाणार आहे. यावर्षी कोरोनामुळे पहिल्यांदाच या पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन राष्ट्रपती भवनात न होता ऑनलाईन होणार आहे. विविध विभागांमध्ये एकूण 74 जणांना पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. यात 26 जणांना अर्जुन पुरस्काराने गौरवण्यात येणार असून यात ठाण्याच्या माधुरीका हिचा समावेश आहे. 

लाॅकडाऊन काळात रेल्वे मालवाहतुकीमुळे 'मालामाल'; गेल्या वर्षीच्या तुलनेत महसूलात 4.3 टक्याने वाढ

ठाणेकर मधुरिका पाटकरच्या शिदोरीत तब्बल सव्वाशेहून अधिक पदकं असून यातील सुमारे पंधरा पदक हि तिने राष्ट्रीय पातळीवरील खेळासाठी कमावली आहेत. 13 वेळा महाराष्ट्र राज्य चॅम्पियनशिप मिळवलेल्या मधुरिकाला शिवछत्रपती पुरस्कारानं सन्मानित केले असून युथ नॅशनल चॅम्पियनशिप, ठाणे क्रीडा पुरस्कार, ठाणे भूषण पुरस्कार, ठाणे गौरव पुरास्कार अशा विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.  

Arjuna award for table tennis player Madhurika Patkar announced

( संपादन ः रोशन मोरे)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Arjuna award for table tennis player Madhurika Patkar announced