मुंबईकरांनो सावधान! कोरोना नियंत्रणात आला असला तरी हायरिस्कमधील रुग्णांच्या संख्येत होतेय मोठी वाढ

मुंबईकरांनो सावधान! कोरोना नियंत्रणात आला असला तरी हायरिस्कमधील रुग्णांच्या संख्येत होतेय मोठी वाढ

मुंबई : महापालिका आणि आरोग्य यंत्रणेच्या अथक प्रयत्नांमुळे मुंबईतील कोरोनाबाधित रूग्णांची संख्या नियंत्रणात येत आहे. सध्या मुंबईत सरासरी हजार ते बाराशे रुग्ण आढळत आहे. मात्र, या रुग्णांच्या संपर्कातील हायरिस्क कॉन्टॅक्टमधील रूग्णांच्या वाढत्या संख्येमुळे मुंबईकरांसमोर नवे संकट उभे ठाकले आहे. कोरोना बाधित रूग्णांच्या संपर्कात येणा-या व्यक्तींचा आकडा मोठा आहे. गेल्या 24 तासात तब्बल 5,429 व्यक्ती अतिजोखमीचे म्हणून नोंदवले गेले. त्यामुळे मुंबईकरांची डोकोदुखी वाढत आहे.

सीबीआय चौकशीनंतर रिया चक्रवर्ती पोलिस ठाण्यात का गेली? भाजप आमदाराने केला सवाल

मुंबईत वारंवार प्रयत्न तसेच जनजगृती करूनही कोरोना बाधित रूग्णांच्या संपर्कात येणाऱ्या व्यक्तींची आकडा दररोज वाढत आहे. गेल्या 24 तासांत बाधित रूग्णांच्या संपर्कात तब्बल 5,429 व्यक्ती आल्या आहेत. या व्यक्तींना समावेश अति जोखमींच्या संपर्कात करण्यात आला आहे. त्यातील 2,211 व्यक्तींना होम क्वारंटाईन करण्यात आले असून 2718 व्यक्तींना कोव्हिड केअर सेंटर 1 मध्ये दाखल करण्यात आले. 

मुंबईतील बाधित रूग्णांच्या संपर्कातील अति जोखमीच्या व्यक्तींचा आकडा वाढतांना दिसतोय. दररोज साधारणता 5 हजाराहून अधिक व्यक्तींचा समावेश अति जोखमींचे संपर्क म्हणून केला जातोय. गेल्या आठवड्याभरात 40,295 बाधित रूग्णाच्या संपर्कात आल्याने अति जोखमीचे संपर्क ठरले आहेत. त्यातील 21,438 व्यक्तींना कोव्हिड केअर सेंटर 1 मध्ये दाखल करण्यात आले.

मुंबईतील कोरोना संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी पालिकेडून ''चेस दी व्हायरस'' मोहीम सुरू करण्यात आली आहे. या माध्यामातून पालिकेने घराघरात जाऊन तपासणी सुरू केली आहे. परिणामी राज्यभरातील अनेक शहरांमध्ये कोरोना संसर्ग वाढत असतांना मुंबईतील रूग्णवाढ मात्र नियंत्रणात ठेवण्यात यश आल्याचे दिसते.

मुंबईत दररोज सरासरी 800 ते 1200 दरम्यान नवे रूग्ण सापडतात. गेल्या दोन दिवसांपासून त्यात देखील वाढ झाली असून 1200 च्या पुन्हा एकदा आकडा जाऊ लागल्याचे दिसते. मुंबईतील एकूण रुग्णसंख्या 1,42,099 झाली आहे. तर मृतांचा आकडा 7,562 वर पोचला आहे. तर आतापर्यंत 1,14,818 रुग्ण बरे होऊन घरी गेले. रुग्ण बरे होण्याचा दर हा 81 टक्के इतका आहे.       
---
संपादन : ऋषिराज तायडे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com