अरमान कोहलीची प्रेयसीला मारहाण 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 6 जून 2018

मुंबई - अभिनेता अरमान कोहली याने प्रेयसीला मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी सांताक्रूझ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस अरमानचा शोध घेत आहेत. अरमान हा चित्रपट निर्माते राजकुमार कोहली यांचा मुलगा आहे. अरमानचे अनेक चित्रपट फ्लॉप ठरले आहेत. तीन वर्षांपूर्वी निरू रंधवा हिच्याशी दुबईतील एका कार्यक्रमात अरमानची ओळख झाली होती. नंतर त्या दोघांच्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले; मात्र त्यांच्यात अनेकदा वाद व्हायचे. रविवारी (ता. 3) त्या दोघांमध्ये वाद झाला. रागाच्या भरात अरमानने प्रेयसीचे डोके भिंतीवर आपटले. त्यात ती जखमी झाली.

मुंबई - अभिनेता अरमान कोहली याने प्रेयसीला मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी सांताक्रूझ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस अरमानचा शोध घेत आहेत. अरमान हा चित्रपट निर्माते राजकुमार कोहली यांचा मुलगा आहे. अरमानचे अनेक चित्रपट फ्लॉप ठरले आहेत. तीन वर्षांपूर्वी निरू रंधवा हिच्याशी दुबईतील एका कार्यक्रमात अरमानची ओळख झाली होती. नंतर त्या दोघांच्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले; मात्र त्यांच्यात अनेकदा वाद व्हायचे. रविवारी (ता. 3) त्या दोघांमध्ये वाद झाला. रागाच्या भरात अरमानने प्रेयसीचे डोके भिंतीवर आपटले. त्यात ती जखमी झाली. तिच्यावर अंधेरीतील खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. या मारहाणप्रकरणी तिने सांताक्रूझ पोलिस ठाण्यात तक्रार दिली. 

Web Title: Armaan Kohli beat girlfriend