अरमान कोहलीवरील गुन्हा मागे

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 16 जून 2018

मुंबई - मैत्रिणीला मारहाण केल्याबद्दल पश्‍चात्ताप व्यक्त केलेला अभिनेता अरमान कोहली याला उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. सांताक्रूझ पोलिस ठाण्यात त्याच्यावर दाखल झालेला गुन्हा मागे घेण्याचा आदेशही खंडपीठाने दिला आहे. त्याच वेळी "टाटा मेमोरियल' आणि "नॅब'ला समाजसेवा म्हणून प्रत्येकी एक लाख रुपये देणगी देण्यासही न्यायालयाने त्याला फर्मावले आहे.

भविष्यात चांगल्या वर्तनाची हमी देणारे प्रतिज्ञापत्र कोहलीने तुरुंगातून उच्च न्यायालयात सादर केले आहे. कोहलीची प्रेयसी नीरू रांधवा हिने आपली तक्रार मागे घेतली आहे. कोहलीच्या कुटुंबीयांनी पीडित नीरूशी यशस्वी तडजोड केल्याने तिने आपण तक्रार मागे घेत असल्याचे न्यायालयात सांगितले. कोहलीच्या देणगीपैकी एक लाख रुपये टाटा मेमोरियलच्या लहान मुलांसाठीच्या शाखेला आणि एक लाख रुपये नॅशनल असोसिएशन फॉर ब्लाइंडला देण्याचा आदेश न्या. आर. एम. सावंत आणि न्या. रेवती मोहिते-डेरे यांच्या खंडपीठाने दिले. अरमान कोहलीने न्यायालयात दिलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे की, "झालेल्या चुकीचा मला पश्‍चात्ताप होत आहे. यापुढे अशी चूक आपल्याकडून होणार नाही.'

नीरूची तडजोड
मूळची ब्रिटिश नागरिक असलेल्या नीरू रंधावाने कोहली कुटुंबीयांकडून ठरलेली रक्कम स्वीकारत असल्याचे उच्च न्यायालयात सांगितले. डोक्‍याला मलमपट्टी केलेली नीरू खास सुनावणीसाठी न्यायालयात उपस्थित होती.

Web Title: armaan kohli crime