esakal | अर्णब गोस्वामी हा भाजपचा लाऊड स्पीकर, संजय राऊतांचा अमित शहांना टोला
sakal

बोलून बातमी शोधा

अर्णब गोस्वामी हा भाजपचा लाऊड स्पीकर, संजय राऊतांचा अमित शहांना टोला

या अटकेवरुन भाजप नेत्यांकडून महाविकास आघाडीवर टीका केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजप नेत्यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे. 

अर्णब गोस्वामी हा भाजपचा लाऊड स्पीकर, संजय राऊतांचा अमित शहांना टोला

sakal_logo
By
पूजा विचारे

मुंबईः अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना अटक करण्यात आली. अर्णब गोस्वामी यांना अलिबाग कोर्टाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. गोस्वामी यांना अटक केल्यानंतर भाजपनं राज्यभरात आंदोलन पुकारलं आहे. या अटकेवरुन भाजप नेत्यांकडून महाविकास आघाडीवर टीका केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजप नेत्यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे. 

अर्णब गोस्वामी हा भाजपचा लाऊड स्पीकर असल्याचा टोलाही संजय राऊत यांनी लगावला आहे. तर . केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीदेखील अर्णब गोस्वामी यांच्या अटकेचा निषेध केला आणि काँग्रेस आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी लोकशाहीला लाज आणल्याचं म्हटलं होतं. यावरुनही संजय राऊत यांनी अमित शहांवरही हल्लाबोल केला आहे.  अर्णब गोस्वामी हे भाजपचे कार्यकर्ते आहे, आपल्या कार्यकर्त्याने नेमका काय गुन्हा केला आहे, हे एकदा समजून घ्या, असा टोला राऊत यांनी केंद्रीय गृहमंत्र्यांना लगावला. 

सामना हे जसं शिवसेनेचं मुखपत्र आहे तसं ते त्यांचं चॅनेल आहे. तो कदाचित भाजपचा लाऊडस्पीकर असेल. आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्याला वाचवण्यासाठी ते उतरले असतील. पण त्याने कोणत्या प्रकारचा गुन्हा केलेला आहे आणि पोलिस कारवाई का करत आहे समजून घेणं गरजेचं होतं, असंही संजय राऊत म्हणालेत.

अधिक वाचाः  अर्णब गोस्वामी: पहिल्यांदाच ११ वाजेपर्यंत सुरु होतं अलिबाग कोर्ट

या प्रकरणाचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी काहीही संबंध नाही. जर या प्रकरणाचे सत्य समोर मांडण्याचा प्रयत्न केला आणि पडद्यामागे काय काय घडामोडी घडल्या, हे जर समोर आणले तर पळता भुई थोडा होईल, असा इशाराही संजय राऊत यांनी भाजपला दिला आहे.

कोर्टाकडून अर्णब गोस्वामींना समज

गोस्वामी कोर्टात गेले, तिथे तेव्हा त्यांनी काही हातवारे केले. तसंच त्यावेळी ते इशारे ही करत होते. गोस्वामी यांचे हातवारे बघून आणि त्यांचं हे वर्तन बघून न्यायाधीश चांगलेच भडकले. त्यांनी लगेचच गोस्वामी यांना समज देत, तुम्ही आधी नीट उभे राहा, हातावारे करु नका, असं म्हटलं.

न्यायाधीशांनी समज देताच अर्णब गोस्वामी यांचं न्यायालयातील वागणं बदललं आणि ते शांत सुनावणी ऐकत होते. दरम्यान गोस्वामी यांना मारहाण केल्याचा आरोप पोलिसांनी फेटाळून लावला.  पोलिसांकडून कोर्टात अर्णब यांना पोलीस कोठडी देण्याची मागणी करण्यात आली होती मात्र कोर्टाने ती फेटाळली. 

मुंबई विभागातल्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी अलिबागमध्ये दाखल एफआयआर रद्द करावा, अशी विनंती करत पत्रकार अर्णब गोस्वामी यांनी मुंबई हायकोर्टात धाव घेतली आहे. त्यांच्या अर्जावर आज दुपारी ३ वाजता सुनावणी होण्याची शक्यता आहे. तिथेही अर्णब यांच्यावतीने जामीन अर्ज केला जाऊ शकतो, असे सांगण्यात आले.

Arnab Goswami is the BJP loudspeaker Shivsena mp Sanjay Raut Said