रिपब्लिक भारतचे अर्णब गोस्वामी यांची पुन्हा चौकशी; 45 दिवसांत दुस-यांदा झाली चौकशी

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 10 June 2020

रिपब्लिक भारत वृत्तवाहिनीचे संपादक अर्णब गोस्वामी यांची बुधवारी मुंबई पोलिसांनी चौकशी केली. सुमारे पाच तास ही चौकशी चालली. गोस्वामी यांच्याविरोधात एन.एम. जोशी मार्ग व पायधुनी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.

मुंबई: रिपब्लिक भारत वृत्तवाहिनीचे संपादक अर्णब गोस्वामी यांची बुधवारी मुंबई पोलिसांनी चौकशी केली. सुमारे पाच तास ही चौकशी चालली. गोस्वामी यांच्याविरोधात एन.एम. जोशी मार्ग व पायधुनी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याबाबत आक्षेपार्ह टीकेवरून  गोस्वामींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यामुळे दीड महिन्य़ापूर्वी मुंबईपोलिसांनी गोस्वामींची 12 तास चौकशी केली होती. आता पायधुनी येथे दाखल गुन्ह्यात चौशीची नोटीस बजावण्यात आली होती. त्यानुसार बुधवारी एन. एम. जोशी पोलिस ठाण्यात गोस्वामी हजर झाले होते.  

 हेही वाचा: बापरे! मुंबईतील झोपड्या-चाळींमध्ये आहेत तब्बल 'इतके' कोरोना रुग्ण; आकडा बघून तुम्हालाही बसेल धक्का... 

रझा अकादमीचे सचिव इरफान शेख यांच्या तक्रारीवरून पायधुनी पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला होता.  29 एप्रिलला  गोस्वामी यांनी वांद्रे रेल्वे स्थानकाजवळील झालेली गर्दी ऐवजी एका धार्मिक स्थळाजवळ ही गर्दी झाल्याचा दावा केला होता. तसेच विशेष समुदायाचे नागरीकच का गर्दी करतात, अशा दावा केला होता. 

त्यामुळे या प्रकरणाला धार्मिक रंग देऊन धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप तक्रारदार यांनी केला आहे. त्यानंतर  त्यांनी याप्रकरणी दक्षिण मुंबईतील पायधुनी पोलिस ठाण्यात तक्रार केली होती. त्यामुळे दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न त्यांनी केल्याचा आरोप तक्रारदाराने केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी भादंवि कलम 153, 153(अ), 295(अ), 500, 505(2),511, 120(ब) 505(1)(ब)(क) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोस्वामी यांच्यासह रिपब्लिक भारत वृत्तवाहनीच्या मालकांविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला होता.

हेही वाचा: पावसाळ्यात कोरोनाचा फैलाव वाढणार? आयआयटी मुंबईचा नवा अंदाज; वाचा नेमकं काय आहे तर...

याप्रकरणी चौकशीसाठी उपस्थित राहण्यासाठी गोस्वामी यांना समन्स पाठवण्यात आले होते. त्यानुसार बुधवारी दुपारी सव्वा दोनच्या सुमारास गोस्वामी एन.एम. जोशी मार्ग पोलिस ठाण्यात हजर झाले.  चौकशीला जाण्यापूर्वी गोस्वामी यांनी प्रसिद्धी माध्यमांना सत्य माझ्या बाजूने आहे, अशी प्रतिक्रिया दिली. पायधुनी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश गायकवाड हे या प्रकरणी तपास करत आहेत.

arnab goswami faces interrogation once again in front of police  

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: arnab goswami faces interrogation once again in front of police