esakal | अर्णब गोस्वामी यांची चॅप्टर प्रक्रियेला गैरहजेरी; कारणे दाखवा नोटीसला वकिलामार्फत लेखी उत्तर
sakal

बोलून बातमी शोधा

अर्णब गोस्वामी यांची चॅप्टर प्रक्रियेला गैरहजेरी; कारणे दाखवा नोटीसला वकिलामार्फत लेखी उत्तर

रिपब्लिक टीव्हीचे अर्णब गोस्वामी यांच्यविरोधात चॅप्टर केसच्या प्रक्रियेला मुंबई पोलिसांनी सुरूवात केली आहे.

अर्णब गोस्वामी यांची चॅप्टर प्रक्रियेला गैरहजेरी; कारणे दाखवा नोटीसला वकिलामार्फत लेखी उत्तर

sakal_logo
By
अनिश पाटील


मुंबई - रिपब्लिक टीव्हीचे अर्णब गोस्वामी यांच्यविरोधात चॅप्टर केसच्या प्रक्रियेला मुंबई पोलिसांनी सुरूवात केली आहे. त्या अंतर्गत कारणे दाखवा नोटीस बजावून शुक्रवारी हजर राहण्यास सांगितले होते. पण या प्रक्रियेला उपस्थित न राहता गोस्वामी यांनी वकिला मार्फत लेखी उत्तर पाठवले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार त्यात गोस्वामी यांनी त्यांच्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.  

मुंबई विद्यापिठाच्या आयडॉल अभ्यासक्रमाला युजीसीची मान्यता; प्रथम वर्षाचे प्रवेश लवकर

ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी केलेल्या तक्रारीच्या आधारे ना.म. जोशी मार्ग पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. भादंवि कलम 153, 153(अ),153(ब), 295(अ),298, 500, 505(2),506, 120(ब) 505(2), 506 अंतर्गत जातीय तेढ निर्माण केल्याप्रकरमी गुन्हा दाखल करण्यात आला होता. याशिवाय रझा अकादमीचे सचिव इरफान शेख यांच्या तक्रारीवरून पायधुनी पोलिसांनी अर्णब गोस्वामीविरोधात गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी गोस्वामी यांच्याविरोधात प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून बंधपत्र का घेऊन नये, यासाठी गोस्वामी यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. त्यासाठी 16 ऑक्टोबरला सायंकाळी चारवाजता उपस्थित राहण्यास सांगण्यात आले होते. पण गोस्वामी यांनी या नोटीसला उत्तर दिले असून यासंबंधीत न्यायालयीने प्रक्रिया सुरू असल्यामुळे नोटीस पाठवण्याच्या अधिकाराबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

--------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )