मुंबई विद्यापिठाच्या आयडॉल अभ्यासक्रमाला युजीसीची मान्यता; प्रथम वर्षाचे प्रवेश लवकर

तेजस वाघमारे
Friday, 16 October 2020

मुंबई विद्यापीठाच्या दूर व मुक्त अध्ययन संस्थेला (आयडॉल) विद्यापीठ अनुदान आयॊगाच्या डिस्टन्स एज्युकेशन ब्युरो (युजीसी-डीईबी) ने शैक्षणिक वर्ष 2020-21 साठी मान्यता दिली आहे.

मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या दूर व मुक्त अध्ययन संस्थेला (आयडॉल) विद्यापीठ अनुदान आयॊगाच्या डिस्टन्स एज्युकेशन ब्युरो (युजीसी-डीईबी) ने शैक्षणिक वर्ष 2020-21 साठी मान्यता दिली आहे. त्यानुसार आयडॉल प्रथम वर्षाचे प्रवेश लवकरच सुरु करणार आहे.

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम आणि इक्बाल मिरचीच्या मालमत्तांचा होणार लिलाव

युजीसी-डीईबीने शैक्षणिक वर्ष 2020-21 साठी भारतातील 33 विद्यापीठांना प्रथम वर्षाचे प्रवेश सुरु करण्यास मान्यता दिल्याचे पत्र 12 ऑक्टोबर 2020 रोजी युजीसीच्या संकेतस्थळावर प्रदर्शित झाले. या पत्रानुसार  मुंबई विद्यापीठाच्या दूर व मुक्त अध्ययन संस्थेलाही शैक्षणिक वर्ष 2020-21 साठी प्रवेश करण्यास मान्यता मिळाली आहे. यानुसार आयडॉल प्रथम वर्ष बीए, बीकॉम व बीएससी आयटी या पदवीस्तरावरील अभ्यासक्रमासाठी तर भाग 1 एमए, एमए शिक्षणशास्त्र, एमकॉम, एमएस्सी गणित, एमएस्सी आयटी व एमसीए या पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे प्रवेश लवकरच सुरु केले जाणार आहेत.

कॉंग्रेस आगामी BMC निवडणूक स्वतंत्र लढणार? पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत मुंबई अध्यक्ष बदलण्याचीही सुचना

युजीसी-डीईबीने  मागील वर्षी आयडॉलच्या 15 अभ्यासक्रमाला मान्यता दिली होती. यानुसार मागील वर्षी जुलैच्या सत्रामध्ये 67 हजार 237 तर जानेवारी सत्रामध्ये 920 विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले होते. 2020-21 या  शैक्षणिक वर्षात आतापर्यंत पदवीस्तरावरील द्वितीय,  तृतीय आणि पदव्युत्तर स्तरावरील भाग 2 साठी 25,697 विद्यार्थ्यांनी  प्रवेश घेतला आहे. या प्रवेशाची अंतिम 20 ऑक्टोबर 2020 आहे.

----------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: UGC accredits Mumbai Universitys Idol course Early first year admission