अन्वय नाईक आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेल्या अर्णब गोस्वामी यांच्या जामीनावर आज फैसला

सुनिता महामुणकर
Monday, 9 November 2020

अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात अटकेत असलेले रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांच्या जामीन अर्जावर मुंबई उच्च न्यायालय सोमवारी फैसला देणार आहे

मुंबई : अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात अटकेत असलेले रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांच्या जामीन अर्जावर मुंबई उच्च न्यायालय सोमवारी फैसला देणार आहे.

हेही वाचा - चित्रपट निर्माता फिरोज नाडियादवाला यांच्या पत्नीला ड्रग्सप्रकरणी अटक; आणखी काही हायप्रोफाल ग्राहक रडावर

न्या एस एस शिंदे आणि न्या एम एस कर्णिक यांच्या खंडपीठापुढे गोस्वामी यांनी हेबियस कौर्प्स याचिका आणि जामीन अर्ज केला आहे. अलिबाग पोलिसांनी दोन वर्षांपूर्वीचे आत्महत्येचे प्रकरण न्यायालयाच्या परवानगी शिवाय तपासासाठी बेकायदेशीरपणे सुरू केले. त्यामुळे ही अटक बेकायदेशीर असून द्वेष पूर्ण हेतूने राज्य सरकारने केली आहे असा युक्तिवाद ज्येष्ठ विधीज्ञ हरीश साळवे यांनी केला आहे. मात्र राज्य सरकार स्वतः च्या अधिकारात ए समरी अहवालाचे प्रकरण फेरतपासासाठी सुरू करु शकते असा युक्तिवाद सरकारच्या वतीने ज्येष्ठ विधीज्ञ अमित देसाई यांनी केला आहे. गोस्वामी यांच्या सह अन्य दोन आरोपींनीही जामीनासाठी याचिका केली आहे. 

हेही वाचा - वैद्यकीय अधिकारी नसल्याने दवाखाना बंद, दहिसर परिसरातील रुग्णांची गैरसोय

खंडपीठाने शनिवारी सुनावणी पूर्ण केली असून निकाल राखून ठेवला आहे. उद्या दुपारी खंडपीठ निकाल जाहीर करणार आहे. दरम्यानच्या काळात तीनही आरोपींना सत्र न्यायालयात जामीन अर्ज करण्याची मुभाही खंडपीठाने दिली आहे. गोस्वामी मागील चार दिवसापासून कारागृहाच्या विलगीकरण कक्षात होते. मात्र आज त्यांना तळोजामध्ये हलविण्यात आले.

Arnab Goswamis bail plea to be heard today

--------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Arnab Goswamis bail plea to be heard today