esakal | मुंबईकरांसाठी पालिकेकडून फक्त दोन दिवसात हजार बेड्सची व्यवस्था

बोलून बातमी शोधा

BMCG

मुंबईकरांसाठी पालिकेकडून फक्त दोन दिवसात हजार बेड्सची व्यवस्था

sakal_logo
By
भाग्यश्री भुवड : सकाळ वृत्तसेवा

मुंबई: मुंबईकरांना अजूनही आयसीयू आणि ऑक्सिजन बेडसाठी वणवण करावी लागत आहे. यावर उपाय म्हणून पालिकेने दोन दिवसांत ऑक्सिजन बेड आणि आयसीयू बेडची सोय करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईच्या वेगवेगळ्या रुग्णालयात पालिका दोन दिवसांत 1000 ऑक्सिजन आणि 100 बेड्स आयसीयू बेड्स उपलब्ध करुन देणार असल्याचे पालिका अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी साांगितले.

पालिका अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले की, दोन दिवसांत हजार ऑक्सिजन आणि 100 आयसीयू बेड्स वाढवले जातील. यासाठी तयारी करण्यात आली आहे. शिवाय, आणखी ही सोय केली जाणार आहे. अजूनही बर्‍याच रुग्णालयांमध्ये बेड्सची अडचण भासत आहे. पण, अजूनही बेड्स वाढवण्यावर भर दिला जाणार आहे.

हेही वाचा: मास्क घाला! रेल्वेकडून विनामास्क प्रवाशांवर कडक कारवाई

जंबो कोविड केंद्रातही बेडसाठी शोधाशोध

जंबो कोविड केंद्रात आयसीयू आणि ऑक्सिजन बेडसाठीही रुग्णांच्या नातेवाईकांकडून शोधाशोध करावी लागत आहे. बीकेसी, गोरेगाव नेस्को, दहिसर जंबो कोविड केंद्रातही आयसीयू, व्हेंटीलेटर उपलब्ध होत नाही.

आयसीयू बेडची कमतरता

गंभीर असणाऱ्या रुग्णांना आयसीयू बेडची गरज भासत आहे. मात्र, अनेकांशी संपर्क करुनही, वॉर रुमशी संपर्क करुनही बेडबाबत माहिती दिली जात नसल्याचा अनुभव मुंबईकर नागरिकांना येत आहे.

फक्त अर्जंट लिस्टमध्ये असणाऱ्या रुग्णांना प्राधान्य दिले जात असून बीकेसी कोविड केंद्रात दाखल होऊन उपचारांसाठी आयसीयू बेड्सची गरज असणारे 200 लोक आहेत. दहिसर कोविड केंद्रातही आयसीयू बेड उपलब्ध होत नसल्यामुळे नातेवाईकांना बेड शोधण्यासाठी धावाधाव करावी लागत आहे.

--------------------

(संपादन- पूजा विचारे)

arrangement of one thousand Oxygen 100 icu beds mumbai bmc facility in two days