आमदार राम कदम यांना अटक करा ; मनसेची मागणी

Arrest to MLA Ram Kadam demanded by MNS
Arrest to MLA Ram Kadam demanded by MNS

उल्हासनगर : मुलींबाबत अनादर करणारे बेताल वक्तव्य करून राज्यभरातील महिला-मुलींचा रोष ओढवून घेणारे भारतीय जनता पार्टीचे आमदार राम कदम यांच्या विरोधात उल्हासनगरात संतापाचे वातावरण पसरले आहे. आज शिवसेना व महिला आघाडीने मीनाताई चौकात कदम यांचा जाहिर निषेध केला आहे. तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महिला आघाडीच्या वतीने सहाय्यक पोलिस आयुक्त मारुती जगताप यांना निवेदन देऊन कदम यांच्या अटकेची मागणी केली.

एकीकडे केंद्र व राज्यातील भाजपा बेटी बचावचा नारा देत असताना त्यांच्याच पक्षातील आमदार राम कदम यांनी बेटी भगाव चे बेताल वक्तव्य केल्याचा जाहीर निषेध उल्हासनगरातील शिवसेनेने मीनाताई ठाकरे चौकात केला. शहरप्रमुख राजेंद्र चौधरी, उपशहरप्रमुख राजेंद्र साहू,दिलीप गायकवाड, गटनेते रमेश चव्हाण, महिला आघाडी संघटक मनीषा भानुशाली, ग्राहक संरक्षण कक्ष शहरप्रमुख जयकुमार केणे, नगरसेवक सुमित सोनकांबळे, सुरेंद्र सावंत, माजी नगरसेवक सुरेश जाधव,नगरसेविका ज्योती माने,युवासेना अधिकारी बाळा श्रीखंडे,के.डी.तिवारी,माजी नगरसेविका समिधा कोरडे,महिला आघाडीच्या स्मिता चिखलकर,मंगला पाटील,निलम लोटानी,सुरेखा दिविलकर,सुनीता घोडके,प्रतिभा कालेकर,हेमा कारंडे,विभागप्रमुख सुरेश सोनवणे, राजू माने,अनिल मराठे,शाखाप्रमुख राजू शिंदे,प्रमोद पांडे,ग्राहक संरक्षण कक्षाचे मनीषा राजपूत,सचिन चव्हाण,आदर्श शिक्षक प्रकाश माळी आदी यावेळी उपस्थित होते.

महाराष्ट्र नवनिर्णमाण महिला सेनेच्या राज्य सचिव उर्मिला तांबे,मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष प्रदीप गोडसे,शहर अध्यक्ष बंडू देशमुख,मनविसेचे शहर अध्यक्ष मनोज शेलार, शहर सचिव  शालिग्राम सोणवने , सचिन बेंडके,मैनऊद्दिन शेख,मुकेश सेतपलानी, सागर चौहान,वैभव कुलकर्णी,सुभाष हटकर,सचिन चांदोसकर ,महिला सेनेच्या सुनंदा शिंपी, मंजू बेंडके,शशिकला साळवी,नंदा भोईर,ज्योती वाघ, सिमरण कल्ला,श्रद्धा साळवी,शिफया सय्यद,विशाखा गोंधळे आदींनी सहाय्यक पोलिस आयुक्त मारुती जगताप यांना निवेदन देऊन राम कदम यांना अटक करण्याची मागणी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com