अनैतिक संबधांच्या आरोपावरून 20 वर्षीय पतीने केली पत्नीची हत्या...

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 15 March 2020

पत्नीच्या अनैतिक संबंधाच्या संशयावरून जुबेरने झारखंड येथे पत्नीची हत्या केली होती. विशेष म्हणजे या तरुणाचे वय फक्त 20 वर्ष आहे

उल्हासनगर ः झारखंडमधील मशांनजोर येथील आरोपी जुबेर शेख (वय 20) याने पत्नीचा गळा आवळून तिची हत्या केली होती. त्यानंतर जुबेर उल्हासनगर येथे पळून आला होता. त्यानंतर पोलिस आपल्या मागावर असल्याची कुणकून लागल्याने तो उल्हासनगरमधूनही पळून जाण्याच्या तयारीत होता. पोलिसांना मिळालेल्या खात्रीलायक सुत्रांच्या माहितीमुळे, आरोपी जुबेरला शहाड रेल्वे स्टेशनकडे जात असताना अटक करण्यात आली. 

'कोरोना'च्या पार्श्वभूमीवर राणीची बाग सोमवारपासून बंद

जुबेर हा पश्‍चिम बंगालमधील मोथावाडी जिल्ह्यातील मालदा टाऊन येथील रहिवासी आहे. त्याचा विवाह दीड वर्षापूर्वी झारखंड येथील तरुणीसोबत विवाह झाला होता. पत्नीवर अनैतिक संबधांचा आरोप करीत त्याने तिची गळा आवळून हत्या केल्याची कबूली पोलिसांना दिली. 

ठाण्यातील कोरोना विलगीकरण केंद्राला नागरिकांचा विरोध!

पत्नीच्या अनैतिक संबंधाच्या संशयावरून जुबेरने झारखंड येथे पत्नीची हत्या केली होती. विशेष म्हणजे या तरुणाचे वय फक्त 20 वर्ष आहे. त्यामुळे  उल्हासनगर पोलिसांनी या तरुणाला अटक केली आहे. संबधीत तरुण झारखंड येथून उल्हासनगर येथे पळून आला होता. तेथूनही पळून जाण्याच्या बेतात असताना पोलिसांनी त्याच्या मुसक्‍या आवळल्या आहेत.

 

Arrested for murdering wife on an immoral affair 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Arrested for murdering wife on an immoral affair