'कोरोना'च्या पार्श्वभूमीवर राणीची बाग सोमवारपासून बंद

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 15 मार्च 2020

महापालिकेने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी भायखळा येथील राणीची बाग (वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान) सोमवारपासून (ता. 16 मार्चपासून पर्यटकांनी रोज गजबजणारे भायखळा येथील आणि प्राणी संग्रहालय बंद ठेवण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. 

मुंबई : महापालिकेने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी भायखळा येथील राणीची बाग (वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान) सोमवारपासून (ता. 16 मार्चपासून पर्यटकांनी रोज गजबजणारे भायखळा येथील आणि प्राणी संग्रहालय बंद ठेवण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व अंगणवाड्या, शाळा, कॉलेजेस बंद

राणी बाग पाहण्यासाठी देशभरातून पर्यटक येतात. विविध प्रकारचे प्राणी पशुपक्षी हे या बागेचे आकर्षण आहे. दीड वर्षांपूर्वी येथे हंबोल्ट पेंग्विंग आणले. त्यानंतर हजारोंच्या संख्येने दररोज पर्यटक येथे भेट देतात. वाघ, बाराशिंगा, तरस, अस्वल, बिबट्यासह विविध प्रजातींचे पक्षी विहार खुले करण्यात आले आहे. राणी बागेचे बदललेले रुपडे पाहण्यांसाठी रोज पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते. सध्या राज्यात कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव वाढला आहे. मुंबईतही रुग्ण आढळून येत आहे. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने शाळा, महाविद्यालये, मॉल, चित्रपटगृह, नाट्यगृह आदी गर्दीचे ठिकाणावर बंदी घातली आहे. मुंबई महापालिकेनेही कोरोनामुळे जिजामाता उद्यान आणि प्राणीसंग्रहालय बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

ठाण्यातील कोरोना विलगीकरण केंद्राला नागरिकांचा विरोध!

कोरोनामुळे गेल्या काही दिवसापासून राणीच्या बागेतील गर्दी कमी झाल्याचे दिसून येत आहे. आज रविवारमुळे सकाळीच सुमारे तीन हजाराहून अधिक पर्यटक राणीबागेत आले होते. कोरोनाचा धोका लक्षात घेवून राणी बागेचे प्रशासन सतर्क झाले आहे. राणी बागेतील अधिकाऱ्यांनी पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यानंतर राणी बाग 16 मार्चपासून पर्यटकांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील आदेश येईपर्यंत पर्यटकांनी राणीबागेत येऊ नये, असे आवाहन प्राणिसंग्रहालयाचे संचालक डॉ. संजय त्रिपाठी यांनी केले आहे. 

ranichi baug is closed from 16 march on the backdrop of 'Corona'


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ranichi baug is closed from 16 march on the backdrop of 'Corona'