Ganesh Festival : चिंचपोकळीचा 'चिंतमणी' मंडपाकडे मार्गस्थ, यंदा १०३ वे वर्ष

arrival of chintamani ganpati mumbai  ganesh chaturthi chintamani aagman ganesh festival 2022
arrival of chintamani ganpati mumbai ganesh chaturthi chintamani aagman ganesh festival 2022

मुंबई : दरवर्षीच राज्यात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मात्र मागील दोन वर्ष कोरोना महामारीमुळे भाविकांना गणेशउत्सावाचा पुरेसा आनंद घेता आला नव्हता. यावर्षी मात्र गणपती उत्सवासाठी सगळीकडे उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. आज शनिवार २७ ऑगस्टला चिंचपोकळीच्या चिंतामणीचं आगमन होत असून गणरायाची मूर्ती मंडपाकडे मार्गस्थ झाली आहे.

यंदा दोन वर्षांनंतर पुन्हा मंडळाकडून गणपतीची भव्य मूर्ती मंडपामध्ये विराजमान होणार आहे. दरम्यान चिंचपोकळीचा चिंतामणीला आज अगदी उत्साहात वाजत गाजत मंडपाकडे नेण्यात येत आहे. या गणेशउत्सवाला १०३ वर्षांची जूनी परंपरा असून यंदाच्या या गणेशाची मुर्ती ही १२ फूट उंचीची असून एकूण उंची ही २२ फूटांपर्यंत गेली आहे. आज बाप्पाला आणण्यासाठी शेकडो कार्यकर्ते जमा झाले होते.

arrival of chintamani ganpati mumbai  ganesh chaturthi chintamani aagman ganesh festival 2022
१३ हजार शाळांच्या संस्थेकडून बोम्मई यांच्या भ्रष्टाचाराची मोंदीकडे तक्रार; पाठवले पत्र

दरम्यान चिंतामणी गणपती आगमनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील वाहतुक व्यवस्थेत बदल करण्यात आला असून याची माहिती मुंबई वाहतूक पोलिसांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे.

वाहतूक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज शनिवार, 27 ऑगस्ट रोजी चिंतामणी गणपती आगमनाच्या पार्श्वभूमीवर सकाळी 12 ते रात्री 10 वाजे दरम्यान काही मार्ग बंद असतील. नागरिकांना विनंती आहे त्यांनी उपलब्ध पर्यायी मार्गांचा अवलंब करण्यात यावे असे सांगण्यात आले आहे.

-सकाळी 12 ते रात्री 10 वाजे दरम्यान डॉ.बी.ए.रोड दक्षिण वहिनी भारतमाता जंक्शन ते बावला कंपाऊंड जंक्शनपर्यंत बंद राहील. नागरिकांनी करी रोड ब्रीज- आर्थर रोड नाका अथवा नाईक चौक-बॅरिस्टर नाथ पै मार्ग या मार्गांचा अवलंब करावा.

- सकाळी 12 ते रात्री 10 वाजे दरम्यान डॉ.बी.ए.रोड उत्तर वहिनी बावला कंपाऊंड जंक्शन ते भारतमाता जंक्शनपर्यंत बंद राहील. नागरिकांनी टी.बी.कदम मार्ग - अल्बर्ट जंक्शन या मार्गाचा अवलंब करावा.

- सकाळी 12 ते रात्री 10 वाजे दरम्यान चिंचपोकळी जंक्शन ते साने गुरुजी मार्ग वाहतुकीसाठी बंद राहील. नागरिकांनी एन.एम.जोशी मार्ग ते खडापारसी जंक्शन या पर्यायी मार्गाचा अवलंब करावा.

arrival of chintamani ganpati mumbai  ganesh chaturthi chintamani aagman ganesh festival 2022
OnePlus चे अगदी स्वस्तातले इयरफोन्स लाँच; किंमत प्रत्येकाच्या बजेटमध्ये

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com