न्यूज रुममध्ये पोहोचल्यावर अर्णब गोस्वामींकडून मुख्यमंत्र्यांना आव्हान

पूजा विचारे
Thursday, 12 November 2020

तळोजा कारागृहातून सुटका झाल्यानंतर अर्णब गोस्वामी पुन्हा न्यूज रुममध्ये पोहोचले. न्यूज रुममध्ये पोहोचल्यानंतर अर्णब गोस्वामी यांनी पुन्हा आक्रमक भूमिका घेतली. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल करत आव्हान दिलं आहे. 

मुंबईः अन्वय नाईक यांच्या आत्महत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या रिपब्लिक वाहिनीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांना सर्वोच्च न्यायालयानं बुधवारी दिलासा दिला.  सर्वोच्च न्यायालयानं अर्णब गोस्वामी यांना अंतरिम जामीन मंजूर केला. तळोजा कारागृहातून सुटका झाल्यानंतर अर्णब गोस्वामी पुन्हा न्यूज रुममध्ये पोहोचले. न्यूज रुममध्ये पोहोचल्यानंतर अर्णब गोस्वामी यांनी पुन्हा आक्रमक भूमिका घेतली. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल करत आव्हान दिलं आहे. 

मला खोट्या प्रकरणात अटक केल्याचं म्हणत उद्धव ठाकरे तुमचा पराभव झाला असल्याचं अर्णब गोस्वामी म्हणालेत. ४ नोव्हेंबरला अन्वय नाईक आणि त्यांची आई कुमुद नाईक यांच्या आत्महत्या प्रकरणात अर्णब गोस्वामी यांना मुंबई पोलिस आणि रायगड पोलिसांनी केलेल्या संयुक्त कारवाईत अटक करण्यात आली होती. 

अधिक वाचा-  चित्रपटगृह मालकांमध्ये कभी खुशी कही गम; नवीन चित्रपट, SOPचा खर्च परवडणारा नाही

उद्धव ठाकरे तुम्ही मला जुन्या प्रकरणात अटक केली आणि माझी माफीही मागितली नाही. खेळ तर आता सुरू झाला असल्याचंही अर्णब गोस्वामी यावेळी म्हणाले. यावेळी त्यांनी रिपब्लिक टीव्ही प्रत्येक भाषेत सुरु करणार असल्याची घोषणाही त्यांनी केली आहे. मी तुरूंगाच्या आतूनही वाहिनी सुरू करेन आणि तुम्ही काहीही करू शकणार नाही, असंही ते म्हणालेत. अर्णब गोस्वामी यांनी आंतरराष्ट्रीय माध्यमांमध्येही आपली उपस्थिती असल्याचंही सांगायला विसरले नाही. 

अर्णब गोस्वामी यांची तळोजा तुरुंगातून सुटका

अर्णब गोस्वामी यांना बुधवारी अखेर सर्वोच्च न्यायालयाकडून अंतरिम जामीनाचा दिलासा मिळाला. न्यायालयाने पन्नास हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर गोस्वामींसह सर्व आरोपींना जामीन मंजूर केला. जामीन नामंजूर करण्यात मुंबई उच्च न्यायालयाने चूक केली असे मत न्यायालयाने व्यक्त केले आहे.

अधिक वाचा-  वरळीतल्या अट्रीया मॉलला नोटीस, अग्निप्रतिबंधक व्यवस्था सदोष

मुंबई उच्च न्यायालयाने गोस्वामी यांना जामीनाचा दिलासा देण्यास नकार दिला होता. तसेच जामीन अर्ज अलिबाग सत्र न्यायालयात दाखल करण्याचे निर्देश दिले होते. या आदेशाला गोस्वामी यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. बुधवारी न्या डॉ धनंजय चंद्रचूड आणि न्या इंदिरा बॅनर्जी यांच्या खंडपीठापुढे याचिकेवर सुनावणी झाली. जर आता या न्यायालयाने हस्तक्षेप केला नाही तर व्यक्ती स्वातंत्र्याच्या मार्गाचा ऱ्हास होण्याच्या दिशेने प्रवास होईल. अशा वेळी उच्च न्यायालयाने यामध्ये हस्तक्षेप करुन स्वतःचा विशेष अधिकार वापरायला हवा होता, अशा शब्दात न्यायालयाने उच्च न्यायालयाच्या निकालावर असमाधान व्यक्त केले. उच्च न्यायालये घटनात्मक पीठ असते. मात्र न्यायालये व्यक्ती स्वातंत्र्य नाकारण्याच्या प्रकरणात भूमिका घेत नाही, असे खडे बोल सुनावले.

Arriving TV studio after release from jail Arnab Goswami challenges Chief Minister Uddhav Thackeray


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Arriving TV studio after release from jail Arnab Goswami challenges Chief Minister Uddhav Thackeray