esakal | ED ची कारवाई, चंदा कोचर यांच्या 78 कोटींच्या संपत्तीवर टाच
sakal

बोलून बातमी शोधा

ED ची कारवाई, चंदा कोचर यांच्या 78 कोटींच्या संपत्तीवर टाच

ED ची कारवाई, चंदा कोचर यांच्या 78 कोटींच्या संपत्तीवर टाच

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई - व्हिडिओकॉन कंपनीला आपले स्वतःचे हितसंबंध जपत मोठे कर्ज मंजूर केल्याचा ठपका असलेल्या आयसीआयसीआय बॅंकेच्या माजी मुख्य कार्यकारी अधिकारी चंदा कोचर यांच्यावर सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) मोठी कारवाई करत त्यांची 78 कोटींची मालमत्ता जप्त केली आहे. चंदा कोचर यांची मुंबईस्थित सदनिका आणि त्यांचे पती दीपक कोचर यांच्या कंपनीची काही मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. 

चंदा कोचर आणि त्यांच्या कुटुंबीयांविरोधात मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणी ईडीने कोचर यांची अनेकदा चौकशीही केली आहे. करण्यात आलेल्या कारवाईनंतर चंदा कोचर यांच्या मालमत्तेवर टाच आणण्यात आली. टाच आणण्यात आलेल्या मालमत्तेत महाराष्ट्रातील फ्लॅट, जमीन, रोकड, तामिळनाडूतील पवनचक्की प्रकल्प व मशीनरी अशा एकून 78 कोटी 15 लाख रुपयांच्या मालमत्तेचा समावेशआहे. ही मालमत्ता चंदा कोचर, त्यांच पती दिपक कोचर व दिपक कोचर यांच्या कंपनीशी संबंधीत असल्याची माहिती ईडीने दिली. 

मोठी बातमी - JNU हल्ल्यातील दहा हल्लेखोरांची ओळख पटली !

चंदा कोचर यांनी त्यांचे पती दीपक कोचर यांना फायादा व्हावा, या हेतूने व्हिडीओकॉन कंपनीवर मेहेरनजर दाखवत त्या कंपनीला मोठे कर्ज मंजूर केले, या आरोपावरून चंदा कोचर यांनी ऑक्‍टोबर 2018 मध्यो राजीनामा दिला होता. कोचर या बॅंकेच्या कार्यकारी संचालक आणि सीईओ असताना, त्यांनी व्हिडीओकॉन कंपनीला पदाचा गैरवापर करत 3250 कोटींचं कर्ज दिले. हे कर्ज देताना कोचर यांनी व्यक्तिगत हित बघितलं आणि त्याचा फायदा घेतला असा त्यांच्यावर आरोप होता. उद्योगपती धूत व चंदा कोचर यांचे पतीन दिपक कोपर यांनी एकत्र येऊन नूपावर रिन्यूवेबल ही कंपनी स्थापन केली होती. त्या कंपनीच्या नावावर 64 कोटी रुपयांचे कर्ज घेण्यात आले होते. त्याशिवाय व्हीडीओकॉन ग्रुपच्या पाच कंपन्यांच्या नावावर तीन हजार 250 कोटी रुपयांचे कर्ज घेण्यात आले होते. त्यातील 86 टक्के रक्कम म्हणजेच दोन हजार 810 कोटी रुपये देण्यात आलेले नाही. त्यानंतर 2017 मध्ये या कर्जाला बुडीत घोषित करण्यात आले होते. 

धक्कादायक - शिकवणीला येणाऱ्या मुलीच्या प्राव्हेट पार्टमध्ये पेन्सिल घालून काढायची व्हिडीओ, पोलिसांनी घेतलं ताब्यात

नूपावरमध्ये दीपक कोचर व धूत यांचे 50-50 टक्के भागिदारी होती. दीपक कोचर यांना या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक बनावण्यात आले होते. त्यानंतर धूत यांनी या कंपनीचे संचालक पद सोडले. धूत यांनी आपले अडीच लाख रुपयांमध्ये 24 हजार 999 शेअर्स न्यूपावरवर हस्तांतरीत केले होते. 

दीपक कोचर यांना व्हिडिओकॉनने सहाय्य करावं यासाठी हे कर्ज देण्यात आले, या आरोपांमुळे चंदा कोचर यांना आयसीआयसीआय बॅंकेच्या प्रमुखपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. हाच ठपका या गुन्ह्यातही कोचर यांच्याविरोधात ठेवण्यात आला आहे. तसेच कर्जाची रक्कम देताना नियमावलीचे पालन झाले नसल्याचा आरोप आहे. 

ED attaches Rs 78 crore worth assets of Chanda Kochhar

loading image