एचआयव्ही रुग्णांसाठी मुंबई महापालिकेचं कौतुकास्पद पाऊल; तब्बल 'इतक्या' रुग्णांना एआरटी‌ केंद्राची मदत..

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 21 June 2020

सध्या कोविड काळ सुरु असून हा काळ नॉन कोविड पण अतिजोखमीच्या रुग्णांसाठी परीक्षेचा काळ आहे. अतिजोखमीच्या रुग्णांत एचआयव्ही रुग्णही येतात. वाहतूक बंद असल्याने एचआयव्ही रूग्ण सुरु असलेल्या उपचारासाठी एआरटी केंद्रामध्ये जाऊ शकत नव्हते.

मुंबई : सध्या कोविड काळ सुरु असून हा काळ नॉन कोविड पण अतिजोखमीच्या रुग्णांसाठी परीक्षेचा काळ आहे. अतिजोखमीच्या रुग्णांत एचआयव्ही रुग्णही येतात. वाहतूक बंद असल्याने एचआयव्ही रूग्ण सुरु असलेल्या उपचारासाठी एआरटी केंद्रामध्ये जाऊ शकत नव्हते. मात्र, यांची आबाळ होऊ नये म्हणून मुंबई जिल्हा एडस नियंत्रण संस्थेने महत्वाचे पाऊल उचलले आहे. यामुळे, एचआयव्ही बाधितांना लॉकडाऊन काळात ही मोठा आधार मिळाला आहे.

मुंबई परिक्षेत्रात 40 हजार एचआयव्ही रुग्ण असून यांचा जीवनमान वाढवणारी औषधे पालिकेच्या एआरटी केंद्रात दिली जातात. लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे एचआयव्हीसह जीवन  जगत असलेल्या व्यक्तींना, त्यांच्या करिता अत्यावश्यक अशी ए आर टी  (अँटी रेट्रोव्हायरल ट्रीटमेंट) औषधे त्याच्या नेहमीच्या ए आर टी  केंद्रावर जाऊन घेणे कठीण झाले आहे. त्यामुळे, वेळेवर औषधे न मिळाल्यामुळे अशा व्यक्तींच्या उपचारामध्ये खंड पडण्याची भीती निर्माण झाली आहे. 

हेही वाचा: कसा साजरा होणार गणेशोत्सव; मुख्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती

शिवाय  एचआयव्ही संसर्गित रुग्णांमध्ये कॉवीड 19 सह आणि इतर गंभीर आजार होण्याचा धोका अधिक असल्याने 23 मार्च रोजी नियोजनासाठी बैठक बोलावण्यात आली असल्याची माहिती मुंबई जिल्हा एड्स नियंत्रण संस्थेच्या अतिरिक्त प्रकल्प संचालिका डॉ. श्रीकला आचार्य यांनी दिली. 

यावर उपाय म्हणून मुंबई जिल्हा एड्स नियंत्रण संस्थेद्वारे एचआयव्ही बाधित रुग्णांना एआरटी उपचार  त्यांच्या जवळच्या सरकारी अथवा महापालिका रुग्णालयांमध्ये उपलब्ध करून दिली जावी असे नियोजन करण्यात आले. तर त्यांना फोनवरून नजीकच्या रुग्णालयाची माहिती आणि हा प्रवास शक्य नसल्यास वस्तीपातळीवरील औषधवाटपा संबधी मार्गदर्शन करण्यात आले.  तर, जवळच्या एआरटी केंद्राविषयी किंवा संबंधित इतर कुठल्याही माहितीसाठी ' एआरटी मित्र  - 022 - 48972305'  या विशेष हेल्पलाईन  क्रमांकावर संपर्क साधण्यात यावा असे आवाहनही करण्यात आले.

मुंबई एडस जिल्हा संस्थेत मुंबईतीलच नाही तर जवळच्या जिल्ह्यातूनही रुग्ण येत असतात. लॉकडाऊन असल्याने बाधितांना प्रवास शक्य नाही. त्यामुळे पहिल्यांदा 13 मार्च रोजीच अतिरिक्त महिन्यांची औषधे घेवून ठेवण्यास सुचवण्यात आले आहे. सगळ्या एआरटी सेंटर कार्यान्वित राहतील अशी नोटीस 23 मार्च रोजी काढण्यात आली. या सेंटर मध्ये नोंदणी झालेलाच नव्हे तर कोणत्याही एचआयव्ही बधिताला औषधे दिली जातात. वसई विरारसारख्या ठिकाणी जिथे एकही एआरटी सेंटर नाही तिथेही तात्पुरता औषध पुरवठा सुरु केला असून अशा रुग्णांसाठी मोबाईल वेब कॅम बनवून रुग्णांची नोंद ठेवली जात आहे. 

हेही वाचा: खबरदार..! मास्क न घालता घराबाहेर पडलात तर...

 

रुग्णांना घरपोच औषधेही - 

ज्या  रुग्णांची औषधांची तारीख लॉक डाउन काळात उलटून गेली, अशांची जवळच्या केंद्रात सोय करण्यात आली आहे. तर काही जण घराबाहेर पडू शकले नाहीत अशा बाधितांसाठी घरपोच औषधे देण्यात आली असल्याचे डॉ. श्रीकला आचार्य यांनी सांगितले. जवळपास 100 ते 200 रूग्णांना घरपोच औषधे देण्यात आली आहेत. यात महिला आणि लहान मुलांचा समावेश आहे

"कोविड काळात बरीचशी आव्हाने होती . मात्र सध्या ती आव्हाने यशस्वी पार झाल्यासारखे वाटत आहे. कित्येक जण वाहतूक बंदमुळे एआरटी सेंटर पर्यंत पोहचू शकत नव्हते. यात महिला आणि लहान मुले हि आहेत . त्यामुळे अशाना घरपोच औषधे देण्यात आली. घरा बाहेर पडू न शकणार्यांसाठी संस्थेची मदत घेऊन औषधे पोहचवली आहेत", असे मुंबई जिल्हा एडस नियंत्रण संस्थेच्या अतिरिक्त प्रकल्प संचालिका डॉ. श्रीकला आचार्य यांनी सांगितले आहे. 

ART center are taking steps for HIV patients 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ART center are taking steps for HIV patients