esakal | कसा साजरा होणार गणेशोत्सव; मुख्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती
sakal

बोलून बातमी शोधा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे येत्या दोन दिवसांत गणेशोत्सवाबाबत अधिकृत धोरण जाहीर करणार आहे

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे येत्या दोन दिवसांत गणेशोत्सवाबाबत अधिकृत धोरण जाहीर करणार आहे 

कसा साजरा होणार गणेशोत्सव; मुख्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : कोरोना विषाणूचे सावट असल्याने यंदा सार्वजनिक गणेश उत्सवाच्या स्वरुपावर मर्यादा येईल. त्यामुळे यंदा उत्सव मंडळांनी मूर्तींची उंची लहान ठेवण्याबाबत विचार करावा. मूर्तीच्या उंचीच्या मर्यादेबाबत येत्या दोन दिवसांत राज्य सरकार अधिकृत धोरण जाहीर करेल, असे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहे.

गणेशोत्सवात प्रत्येक छोट्या – मोठ्या गोष्टींचे कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात ठेवून नियोजन करावे. उत्सव मंडपही लहान असावेत. सोशल डिस्टन्सिंग आणि आरोग्यविषयक सर्व काळजी घ्यावी. विषाणूचे संकट टळल्यानंतर पुढच्या वर्षी हाच गणेशोत्सव गतवर्षीच्या उत्सवाच्या कितीतर पट उत्साहाने साजरा करता येईल. हा विश्वास बाळगून यंदाचा उत्सव साजरा करूया, असे आवाहन मुख्यमंत्री यांनी केले.

खालापूर येथे खोदकामात सापडली शंकराची पिंड; नागरिकांमध्ये उत्सुकता...

मुंबई शहर जिल्ह्यातील प्रमुख गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज आगामी गणेशोत्सवाच्या अनुषंगाने व्हिसीद्वारे संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. यामध्ये आमदार अजय चौधरी, मुंबई शहर जिल्ह्यातील सार्वजनिक उत्सव समन्वय समितीचे पदाधिकारी तसेच विविध मंडळांचे पदाधिकारी सहभागी होते. यावेळी मूर्तीची उंची, उत्सवाचे स्वरूप यांसह पारंपारिक विसर्जन मार्ग आणि गणेश विसर्जन व्यवस्था या अनुषंगानेही चर्चा झाली.

सरकारला पुर्ण सहकार्य करु!
कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाला रोखण्याच्या शासनाच्या प्रय़त्नांना सर्वतोपरी सहकार्य करू, अशी भूमिकाही मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी जाहीर केली.मुंबईतील गणेश मंडळांची समाजाभिमुख उपक्रमात योगदान देण्याची परंपरा आहे. त्यामुळे कोरोनाच्या संकट काळात मंडळे आरोग्यविषयक जनजागृती, आरोग्य मेळावे, शिबिरे आदी उपक्रमांद्वारे यावर्षीही हिरिरीने पुढे राहतील, असा विश्वास मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना दिला.

खबरदार..! मास्क न घालता घराबाहेर पडलात तर...

loading image
go to top