esakal | खबरदार..! मास्क न घालता घराबाहेर पडलात तर...
sakal

बोलून बातमी शोधा

Face_Mask

कोरोनाचे सावट डोक्यावर कायम असताना राज्यात लॉकडाऊनही टप्प्याटप्प्याने शिथिल होत आहे. त्यामुळे रस्त्यावरील वर्दळही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे राज्यासह कल्याण-डोंबिवलीतही कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे.

खबरदार..! मास्क न घालता घराबाहेर पडलात तर...

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

कल्याण : कोरोनाचे सावट डोक्यावर कायम असताना राज्यात लॉकडाऊनही टप्प्याटप्प्याने शिथिल होत आहे. त्यामुळे रस्त्यावरील वर्दळही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे राज्यासह कल्याण-डोंबिवलीतही कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे नागरिकांनी खबरदारी घेण्याची गरज निर्माण झाली आहे. 

अरे देवा! दक्षिण मुंबईतल्या 'या' दोन इमारती ठरतायेत कोरोनाचा हॉटस्पॉट...

कल्याण डोंबिवली महानगरपालिका हद्दीत लॉकडाऊन शिथिल केल्याने मोठ्या संख्येने नागरिक घराबाहेर पडत आहेत.बहुतांश नागरिक  तोंडाला मास्क न बांधता इतरत्र फिरत असल्याने संसर्गाचा धोका वाढण्याची दाट चिन्हे आहेत. त्यामुळे मास्क न बांधता बाहेर फिरणाऱ्या व्यक्तीवर आता कारवाई करण्याचे आदेश कल्याण-डोंबिवली महापालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिले आहे.

फादर्स डे स्पेशल : 'या' कलाकारांनी व्यक्त केल्या आपल्या वडिलांबद्दलच्या भावना...

मास्क, रुमाल किंवा इतर कापड नाका-तोंडाला परिधान न करता नागरिक दिसले तर त्यांच्याकडून 500 रुपये दंड आकारावा व दंड न भरल्यास कायदेशीर कारवाई करावी अशा आशयाचे परिपत्रक सूर्यवंशी यांनी काढले आहे. 

क्या बात है! 20 दिवसांच्या लढाईनंतर 'त्यांनी' केली कोरोनावर यशस्वी मात... 

लॉकडाऊन शिथिल करताना दुकानदार व नागरिक यांनी मास्क परिधान करून  सोशल  डिस्टनसिंग पाळावे अशा सूचना प्रशासनाने दिल्या होत्या. मात्र कल्याण आणि  डोंबिवली या दोन्ही शहारत सोशल डिस्टनसिंगच तर सोडाच पण नागरिक  मास्क परिधान न करता फिरू लागले आहे.

मुंबईतील क्रीडा साहित्य विक्रेते चीनशी पंगा घेणार; वाचा नेमकं काय करणार ते...

अशा नागरिकांवर कारवाई करण्यासाठी पालिकेच्या दहाही प्रभागांमध्ये आरोग्य निरीक्षक व कर्मचा-यांची नियुक्ती करण्यात आली आहे.  त्यामुळे मास्क न घालणाया व्यक्तीला 500 रुपये मोजावे लागणार आहे. तर दंडाची रक्कम न भरणा-यांवर फौजदारीं कारवाई करावी असेही आदेश आयुक्तांनी दिले आहेत.

loading image
go to top