esakal | भिवंडीच्या खड्ड्यांनी घेतला आर्ट डायरेक्टरचा बळी, जागेवरच मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

भिवंडीच्या खड्ड्यांनी घेतला आर्ट डायरेक्टरचा बळी, जागेवरच मृत्यू

एका आर्ट डायरेक्टरचा जागेवर मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. भिवंडी- वसई मार्गावरील असलेल्या खड्ड्यांमुळे या डायरेक्टरचा मृत्यू झाला आहे. हर्ष विनोद सिंह असं या आर्ट डायरेक्टरचं नावं होतो.

भिवंडीच्या खड्ड्यांनी घेतला आर्ट डायरेक्टरचा बळी, जागेवरच मृत्यू

sakal_logo
By
पूजा विचारे

मुंबईः एका आर्ट डायरेक्टरचा जागेवर मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. भिवंडी- वसई मार्गावरील असलेल्या खड्ड्यांमुळे या डायरेक्टरचा मृत्यू झाला आहे. हर्ष विनोद सिंह असं या आर्ट डायरेक्टरचं नावं होतो. हर्ष हा २६ वर्षांचा असून तो ठाण्याचा रहिवासी होता. भिवंडी- वसई मार्गावर असलेल्या खड्ड्यात हर्षची बाईक आदळली. त्यातच जागी त्याचा मृत्यू झाला. 

नायगाव येथे शूटिंगचे लोकेशन पाहून वसई- भिवंडी मार्गानं हर्ष घरी जात होता. त्याचवेळी त्याच्यावर मृत्यू ओढावला. ठाणे जिल्ह्यात गुरुवारी मुसळधार पाऊस होता. त्याचवेळी भिवंडी- वसई रोडवरच्या कालवार गेट परिसरातही गुरुवारी जोरदार पाऊस झाला. पावसामुळे खड्ड्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचलं होतं. 

अधिक वाचाः  भिवंडी इमारत दुर्घटनेत २० चिमुरड्यांचा निप्षाप मृत्यू

याच रस्त्यावरुन हर्ष नायगावमधील शूटिंगचं लोकेशन बघून घरी निघाला होता. मात्र घरी परतताना खड्ड्यात आदळली आणि दुभाजकाला धडकली. त्यातच हर्षचा जागीचा मृत्यू झाला. या अपघाताची नोंद पोलिसांनी भोईवाडा पोलिस स्टेशनमध्ये करण्यात आली आहे. 

अधिक वाचाः  NCB कडून मुंबईत तीन ठिकाणी छापेमारी, ड्रग्स डिलर्सची दाणादाण

Art director Harsh Singh Died road accident bhiwandi vasai highway