महाभारतातील 'या' कथेवरून तृतीयपंथीय करतात एका दिवसाचं लग्न...

Article on transgenders Covagam festival in India
Article on transgenders Covagam festival in India

मुंबई: चीनमधून सुरु झालेल्या 'कोरोना' या व्हायरसने जवळपास सगळे जग आपल्या कवेत घेतलंय. सारं जग ठप्प झाल्यात जमा आहे. आपल्या देशाचं बोलायचं झालं तर आपण खबरदारीचा उपाय म्हणून २१ दिवस 'लॉकडाउन' केले आहे. त्यात माणसांच्या करमणुकीचे साधन असलेल्या टीव्हीवर नवीन कार्यक्रम शूटिंग बंद असल्यामुळे येत नाहीत. भारत सरकारनेही लोकांची गरज ओळखून जुन्या मालिका सुरु करण्याचा निर्णय घेतला. रामायण, महाभारत आणि शक्तिमान पुन्हा टेलिकास्ट होत आहेत. काही लोकांनी महाभारत बघण्यापेक्षा वाचण्याला प्राधान्य दिल्याचे दिसते.

काल सहज अशाच लोकांशी बोलण्याचा योग्य आला. त्यांनी मला महाभारतातील अर्जुन आणि नागकन्या उलुपी यांचा पुत्र 'अरावन' या पात्राची कहाणी सांगितली. पुढे जाऊन अजून एक गोष्ट समजली, आजही 'अरावण'ची आठवण म्हणून किन्नर समाज 'कुवगम' हा उत्सव साजरा करतात. नेमका हा उत्सव काय आहे आणि का साजरा करतात हे आपण जाणून घेऊयात. 

आजही किन्नर, तृतीयपंथ किंवा हिजडा म्हटलं आपला समाज त्यांच्याकडे हीन नजरेने बघण्यास सुरुवात करतो. समाजात त्यांना आहे तसे स्वीकारण्याची मानसिकता अजून तयार झालेली नाही. कोणी कामही देत नाही. काम मिळवण्यासाठी मोठा संघर्ष त्यांना करावा लागतो. काही पर्याय शिल्लक राहिला नाही तर देह विक्री करून किंवा भीक मागून आपला गुजारा करावा लागतो.

बाकीच्या समजाप्रमाणे तृतीयपंथीयांच्या देखील स्वतःच्या काही प्रथा आहेत. त्यांची जमात सिस्टीम आहे. एक तृतीयपंथ दुसऱ्या एका तृतीय पंथीयांना दत्तक घेतो. यामध्ये समलैंगिक पुरुषाला मुलगा तर समलैंगिक महिलेला मुलगी म्हणून दत्तक घेतात. त्यांच्या प्रथांपौकी सर्वात मोठी प्रथा म्हणजे 'कुवगम' उत्सव. हा उत्सव तृतीय पंथीयांचा भारतातील सगळ्यात मोठा उत्सव आहे. हा उत्सव अर्जुन पुत्र 'अरावण'ची आठवण म्हणून 'कुवगम' हा उत्सव साजरा करतात.  

काय आहे 'अरावण'ची कथा 

महाभारतात असं सांगितलं जातं की अर्जुनाने आपले थोरले बंधू युधिष्ठिर आणि द्रौपदी यांचा एकांतवास मोडला म्हणून एक वर्षाचा वनवास अशी शिक्षा होते. वनवासाची शिक्षा भोगत असताना अर्जुनाची भेट नागकन्या उलुपीशी होते. या नागकन्येपासून अर्जुनाला झालेला मुलगा म्हणजे 'अरावण'. अरावण हा खूप पराक्रमी असतो. महाभारत युद्धापूर्वी पांडवांनी काली मातेच्या एका विशाल पूजेचे आयोजन केलेले असते. पूजा संपन्न झाल्यानंतर शूरवीर राजकुमाराचा देवीला बळी द्यायचा असतो. एकही राजकुमार यासाठी तयार होत नाही. तेव्हा अरावण यासाठी तयार होतो. पण त्याची एक शेवटची इच्छा असते की मरण्याअगोदर लग्न करण्याची. अरावणशी लग्न करून दुसऱ्या दिवशीच विधवा व्हावे लागेल म्हणून एकही स्त्री त्याच्याशी लग्न करायला तयार होत नाही. विधवा देखील नकार देतात. अशावेळी श्रीकृष्ण स्वतः मोहिनीचे रूप धारण करून अरावणशी विवाह करतात. या कारणामुळे समाज ज्या तृतीयपंथीयांना लग्नाची मान्यता देत नाहीत ते हा उत्सव साजरा करतात. अरावणच्या त्यागाची आठवण म्हणून त्याच्याशी एका रात्रीसाठी विवाह करतात. 

हा उत्सव खासकरून कोठे व कसा साजरा केला जातो 

हा उत्सव खासकरून तामिळनाडूमधील 'कुवगम' या गावात होतो. हा उत्सव अठरा दिवसांपर्यंत चालतो. तामिळनाडूच्या 'चित्राई' या नववर्षाच्या सुरवातीला हा उत्सव साजरा केला जातो. 'कुवगम' गावात 'कोथांदवर मंदिर’ हे अरावणच्या प्रति समर्पित केलेलं आहे. या उत्सवात देश विदेशातून जवळपास लाखापेक्षा लोक सहभागी होतात. या मंदिरामध्ये चित्राईच्या १७व्या दिवशी किन्नरांच्या लग्नाचा उत्सव साजरा केला जातो. सर्व तृतीय पंथीय नव्या नवरीसारखे नटतात. सरकारी कार्यलयांमधून मंगळसूत्र खरेदी करतात ज्याला 'ताळी' असं म्हणतात. या रात्री अग्निकुंड पेटवून तृतीय पंथीय अरावणच्या नावाचे मंगळसूत्र घालतात. लग्नाचे रात्रभर सेलिब्रेशन करतात. हे करण्याचे कारण काय तर त्याच्यामते अरावण हा त्यांना जगायला शिकवत असतो. 

या उत्सवातील १८ व दिवस हा अरावणच्या त्यागाचा दिवस म्हणून साजरा केला जातो. या दिवशी अरावणचा मोठा पुतळा बनवला जातो. त्यादिवशी सर्वजण सकाळी एकत्र जमतात. रांगोळ्या काढल्या जातात. मोठ्या प्रमाणावर कापूर पेटवून 'कुमी' हे गाणं म्हटलं जाते. हे लग्नाचे शेवटचे क्षण असतात. त्यांनतर अरावणची मिरवणूक काढून त्याचा त्याग केला जातो. अरावणचा त्याग केल्यानंतर तृतीय पंथीय विधवा होतात. गळ्यातील मंगळसूत्र तोडतात तर कपाळावरील कुंकू पुसतात. जोरजोरात रडतात जसं की पती गेल्यानंतर मोहिनीने आक्रोश केला होता. हा उत्सव झाल्यानंतर तृतीयपंथीय या उत्सवातील आनंद, दुःख सोडून पूर्वीच्या जीवनात परतात.

Article on transgenders Covagam festival in India read unknown facts  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com