जगात कोरोनासारखे आहेत १ लाख कोटी व्हायरसेस; यातील आपल्याला केवळ 'एवढेच' माहिती आहेत

जगात कोरोनासारखे आहेत १ लाख कोटी व्हायरसेस; यातील आपल्याला केवळ 'एवढेच' माहिती आहेत

मुंबई: सध्या जगावर कोरोनाचं सावट संपूर्ण जगावर आहे. हजारो लोकांना कोरोना नावाच्या व्हायरसमुळे आपले प्राण गमवावे लागले आहे. मात्र शास्त्रज्ञांनी एक धक्कादायक खुलासा केला आहे. जगात कोरोनासारखे तब्बल १ लाख कोटी व्हायरस आहेत यातले काही व्हायरसेस मानवी शरीरावर थेट  तर काही मानवी सजहतीरावर परिणाम करत नाहीत. यूनिवर्सिटी ऑफ सिडनीच्या काही शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार जगात तब्बल १ लाख कोटी व्हायरस हवेत आहेत. त्यापैकी काही व्हायरसची नावसुद्धा आपल्याला माहिती नाहीत. या १ लाख कोटी व्हायरसपैकी फक्त ७००० व्हायरसचेच नमुने आतापर्यंत शास्त्रज्ञांच्या हाती लागले आहेत. इबोला, कोरोना हे व्हायरसही यातलेच आहेत.

आतापर्यंत झालंय ६८२८ व्हायरसेसचं नामकरण:

सतराव्या शतकाच्या शेवटपर्यंत रेबीज आणि इन्फ्लुएंझा या रोगांचं कारण व्हायरस आहे हे स्पष्ट झालं होतं. त्यानंतर शास्त्रज्ञांनी शोध लावून तब्बल ६८२८ व्हायरसचं बारसं केलं. मात्र अजूनही करोडो असे व्हायरस आहेत ज्यांना कोणताहि नाव दिलं गेलेलं नाही. अनेक व्हायरसेसचा शोध लावणं देखील बाकी आहे असं शास्त्रज्ञांनी सांगितलंय.  

समुद्रातही असतात व्हायरस:

अमेरिकेच्या ओहायो स्टेट यूनिवर्सिटीच्या विशेषतज्ञांनी समुद्रात असलेले तब्बल २ लाख व्हायरस शोधून काढले. आणि त्यातील १५००० व्हायरसची माहिती शास्त्रज्ञांच्या हाती लागलीये.

एकट्या कोरोनाचे आहेत ३९ प्रकार:

आतापर्यंत कोरोना व्हायरसच्या तब्बल ३९ प्रजातींची माहिती शास्त्रज्ञांच्या हाती लागलीये. जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच WHO च्या सर्वेक्षणानुसार सध्या पसरलेल्या नॉवेल कोरोना व्हजायर्समुळे होणाऱ्या आजाराला COVID-19 असं नाव देण्यात आलंय. यातील नॉवेल चा अर्थ नवीन किंवा ऍडव्हान्स असा मनाला जातो. 

१०२ वर्षांपूर्वीही असंच काही:

विशेष म्हणजे या १ लाख कोटी व्हायरसपैकी फक्त २५० व्हायरसच्या प्रजातीच मानवी शरीरासाठी घातक असतात असंही शास्त्रज्ञांकडून सांगण्यात येतंय. तब्बल १०२ वर्षांपूर्वी असाच व्हायरस स्पेनमध्ये पसरला होता आणि त्यानंतर या व्हायरसचं प्रमाण जगभरात वाढत गेलं होतं. यामुळे जगात ५ कोटींपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला होता. भारतात यामुळे दिड कोटी लोकांचा मृत्यू झाला होता. त्यावेळीही मास्क लावणं आणि घराच्या बाहेर न निघणं अनिवार्य करण्यात आलं होतं.

there are more than 1 lac crore viruses around us and we know only 6828 of them

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com