esakal | #AareyForest 'आरे'बद्दल या महत्वाच्या गोष्टी माहिती आहेत का?
sakal

बोलून बातमी शोधा

article on why Aarey Forest is so important for Mumbai

#AareyForest 'आरे'बद्दल या महत्वाच्या गोष्टी माहिती आहेत का?

sakal_logo
By
टीम ईसकाळ

गेल्या काही दिवसांपासून मुंबईमध्ये सर्वांत जास्त तापलेला विषय म्हणजे आरे जंगल. सरकारने आरेतील 2700 झाडे कापून त्याजागी मेट्रो कारशेड करण्याचा निर्णय घेतला आणि मुंबई उच्च न्यायलायानेही याला परवानगी दिली. परवानगी मिळताच एका रात्रीत गुपचूपपणे 200 झाडांची कत्तल करण्यात आली. तब्बल 2400 झाडांची कत्तल झाल्यानंतर आता उच्च न्यायालयाने या वृक्षतोडीस तात्काळ स्थगिती दिली आहे. आता या स्थगितीचा उपयोग तरी आहे का? या आरेचा नेमका मुद्दा आहे तरी काय?

मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनने कारशेडमध्ये अडथळा ठरणारी झाडे कापण्याचा निर्णय घेतला कारण त्यांच्यामते आरे हे जंगल नाहीये.

पण आरे हे जंगल आहे. कारण-
1. प्रत्येक झाड वर्षभरात 20 किलो कार्बनडायऑक्साईड शोषून घेते. जेव्हा तुम्ही 80 किमीपर्यंत तुमची कार चालवता तेव्हा एवढा कार्बनडायऑक्साईड बाहेर फेकला जातो. 

2. आरेमध्ये पक्षी, फुलपाखरं, सरपटणारे प्राणी, कोळी आणि अशा 240 प्रजातींच्या पक्षी आणि प्राण्यांचे घर आहे. 

3. आरेमध्ये दहा हजाराहूंन जास्त आदिवासी पिढ्यांपिढ्या इथल्या झाडांना कोणतीही इजा न करता राहत आहेत.

आता अनेक लोकांना हा प्रश्न पडला असेल की ही तोडलेली सगळी झाडं दुसऱ्या ठिकाणी लावली जाणार आहेतच की. मात्र, अनेकांना हे माहित नसेल की या पुन्हा लावलेल्या झाडांच्या आयुष्याची फक्त 30 टक्केच ग्वाही असते. 

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तोडलेल्या झाडांएवढीच नवी झाले लावणार असल्याची ग्वाही दिली आहे. मात्र, जी नवीन झाडं लावली जातील ती रोपं असणार तर दुसरीकडे जी झाडं कापली गेली आहेत ती तब्बल 100 वर्ष जुनी होती. 

याबाबत काही प्रश्न निर्माण झाल्याशिवाय राहत नाहीत -
1. या रोपांची काळजी कोण घेणार?
2. शहरातील पूल वाचविण्यासाठी आपण त्याच्यावर मेट्रो बांधू शकतो तर झाडं वाचविण्यासाठी का नाही?
3. आपल्याला खरचं 32 मजली मेट्रो भवनाची गरज आहे का? आणि ते ही जंगलाच्या बरोबर मध्यात?
4. कारशेडनंतर ही वृक्षतोड थांबणार की ही फक्त सुरवात आहे?

मुबंईला मेट्रोची गरज आहे मात्र, त्यासाठी आरेतील झाडं तोडणं हे साफ चुकीचं आहे. 

मेट्रो कारशेडसाठी आरे व्यतिरिक्त कोणते आहेत पर्याय?
1. बॅकबे
2. महालक्ष्मी
3. कंजूरमार्ग
4. धारावी
5. कलिना
6. बिकेसी
7. MIDC सिप्झ

आरेमध्ये होणार या तीन गोष्टी -
1. SRA प्रकल्प
2. मेट्रो कारशेड
3. प्राणी संग्रहालय

ही गोष्ट हास्यास्पद आहे की आपण प्राणी संग्रहालय करण्यासाठी जंगल तोडत आहोत. गोरेगावमध्ये बिबट्या घरात शिरु लागला आहे, अशावेळी आपल्याला खरंच प्राणी संग्रहालयाची गरज आहे का? 

आरे जंगल नष्ट झाल्यावर होणारे परिणाम-
1. पाण्याची भूजल पातळी घटणार
2. धूळ वाढणार
3. प्रदूषण वाढणार

या नेत्यांना आरेतील वृक्षतोडीस दिली परवानगी -
भाजप :

1. अभिजीत सामंत 
2. अलका केरकर
3.आकाश पुरोहित
4. हरिश भांगीर्डे

राष्ट्रवादी :
1. कप्तान मलिक

तज्ञ मंडळी :
1. सुभाष पटणे
2. डॉ. चंद्रकांत साळुंखे
3. डॉ. शशिकला सुरेशकुमार

काँग्रेस : (मत न देता निघून गेले)
1. जगदीश कुट्टी
2. सुशमा राय 

आरे वाचविणं तर आता आपल्या हातांत उरलेलं नाही. या नेत्यांना आपल्या मतांची गरज आहे आणि म्हणूनच ज्यांनी या वृक्षतोडीस परवानगी दिली त्यांना धडा शिकवणं आपल्याच हातात आहे.  
 

loading image
go to top