दादर, माहीममध्ये 'या' ठिकाणी होणार कृत्रिम तलावांची निर्मिती; मनसेच्या पाठपुराव्याला यश

रजनिकांत साळवी
Thursday, 13 August 2020

कोरोनापार्श्वभूमीवर दादर- माहीम परिसरात कृत्रिम तलावांची संख्या वाढवावी, अशी मागणी मनसेच्या वतीने करण्यात आली होती. त्यास पालिकेने संमती दर्शविली आहे.

प्रभादेवी : कोरोनापार्श्वभूमीवर दादर- माहीम परिसरात कृत्रिम तलावांची संख्या वाढवावी, अशी मागणी मनसेच्या वतीने करण्यात आली होती. त्यास पालिकेने संमती दर्शविली आहे.

समुद्रात मुर्ती विसर्जनाबाबत आली सर्वात मोठी बातमी; जाणून घ्या BMC ने काय दिल्या आहेत सूचना

गणेशोत्सव काळात घरगुती गणेश मुर्तींंचे विसर्जन कृत्रिम तलावात करण्याचे आव्हान मुंबई महापालिकेने केले आहे. मात्र, दादर-माहिममध्ये प्रत्यक्षात कृत्रिम तलावांची संख्या कमी असल्याबाबतचे निवेदन मनसेचे उपाध्यक्ष व दादर-माहीम विधानसभा विभाग अध्यक्ष यशवंत किल्लेदार यांनी गुरुवारी पालिकेचे जी उत्तर विभागाचे सहाय्यक आयुक्त यांना दिले. तसेच, दादर-माहीम परिसरात कृत्रिम तलावांसाठी मनसेने जागाही सुचविल्या. त्यानुसार पालिकेच्या जी उत्तर विभागाने परिसरात 7 ठिकाणी कृत्रिम तलावांची निर्मिती करण्याचे आश्वासन दिल्याचे किल्लेदार यांनी सांगितले. 

वसई - विरारमध्येही गणरायाच्या आगमन आणि विसर्जनासाठी महापालिकेने ठरवली ही नियामावली; जाणून घ्या सविस्तर

शिवाजीपार्क येथील महापालिका क्रीडा भवन, मृदुंगाचार्य मैदान, रमा गावंडे मैदान, जाखादेवी मंदिर भूखंड-दादर, एनटोणीया शाळेचे पटांगण, एस. के. बोले रोड येथील चौधरी वाडी मैदान, प्रभादेवी येथील चवन्नी गल्ली मैदान येथे व धारावीत तीन कृत्रिम तलावांची निर्मिती करण्यात येणार आहे.

----------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Artificial ponds to be constructed in Dadar, Mahim; Success in the pursuit of MNS