शिधावाटप दुकानांत अन्नधान्याची कृत्रिम टंचाई 

file photo
file photo

मुंबई : मुंबईतील अनेक शिधावाटपाच्या दुकानांमध्ये सध्या अन्नधान्याची कृत्रिम टंचाई निर्माण झाली आहे. सरकारी गोदामातून दुकानांपर्यंत धान्य पोहोचवण्यासाठी नियुक्त करण्यात आलेले वाहतूकदार वेळेत माल उचलत नसल्याचा फटका नागरिकांना बसत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून हा प्रकार सुरू असून वाहतूकदारांच्या या भूमिकेवर संशय व्यक्त व्यक्‍त करण्यात येत आहे.

या कामचुकार वाहतूकदारांना दंड करण्यात येत असला, तरीही गोरगरिबांना मात्र खासगी दुकांनामधून महागडे धान्य विकत घेऊन गुजराण करावी लागत आहे. भारतीय खाद्य निमगच्या गोदामांपासून अधिकृत शिधावाटप दुकांनापर्यंत धान्य आणि इतर साहित्याचे वितरण करण्यासाठी शिधावाटप विभागाकडून चार वाहतूकदार नियुक्त करण्यात आले आहेत. मात्र, हे वाहतूकदार मुंबईतील अधिकृत दुकानांसाठी ठरवून दिलेले साहित्य पूर्ण क्षमतेने गोदामातून उचलत नसल्याची धक्कादायक माहिती माहितीच्या अधिकारातून उघड झाली आहे.

धारावी परिसरात शिधावाटप दुकानांमध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून धान्य; तसेच इतर वस्तूंची टंचाई जाणवत आहे. त्यामुळे धारावीतील सामाजिक कार्यकर्ते ओमकार विश्‍वकर्मा यांनी नियंत्रक शिधावाटप व संचालक नगरी पुरवठा कार्यालयात माहितीच्या अधिकारांतर्गत माहिती मागवली. त्यात मुंबईतील पाचपैकी चार परिमंडळांतील एकाही वाहतूकदाराने 100 टक्के माल उचलला नसल्याचे समोर आले आहे. 

ठोठावण्यात आलेला दंड 
- श्री. जे. बी. ग्रेन डीलर्स असोसिएशन - 12 लाख 36 हजार 919 
- क्रिएटीव्ह ग्रेन्स ऍण्ड ट्रान्स्पोर्ट - 25 लाख 60 हजार 927 
- साईनाथ ग्रेन ट्रेडर्स - 12 लाख 36 हजार 119 
- शिरीष कार्गो प्रा. लिमिटेड - 71 लाख 03 हजार 457 

काळ्या यादीत टाकण्याची मागणी 
या दंडाची वसुली करून या कंपन्यांना काळ्या यादीत टाकावे, अशी मागणी विश्वकर्मा यांनी केली आहे. त्याचबरोबर माहिती अधिकारात माहिती विचारल्यानंतर कारवाई केल्याची दाखवले जात आहे, असा आरोपही विश्‍वकर्मा यांनी केला. 

चारपैकी दोन कंपन्यांवर कारवाई करून दंड वसूल केला गेला आहे. तर दोन कंपन्यांवर दंडात्मक कारवाईला शासन पातळीवरून स्थगिती दिली आहे. अशा कंपन्यांना काळ्या यादीत टाकण्याची तरदूद नाही. 
- कैलास पगारे, शिधावाटप नियंत्रक 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com