अरुण अडसड यांना विधान परिषद सदस्यत्वाची शपथ

Arun-Adsad
Arun-Adsad

मुंबई - माजी कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या विधान परिषद सदस्य पदी अरुण जनार्दन अडसड यांची निवड झाली होती. विधानभवनातील सभापती यांच्या दालनात विधान परिषद सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी अडसड यांना मंगळवारी विधान परिषद सदस्य पदाची शपथ दिली.

अडसड हे दोन वेळा विधानसभेचे सदस्य होते. तसेच ते विदर्भ औद्योगिक विकास महामंडळाचे अध्यक्षही होते. या वेळी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, संसदीय कार्यमंत्री गिरीश बापट, आमदार आकाश फुंडकर, भाई गिरकर, मनीषा चौधरी आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com