नवी मुंबई महापालिकेने वाढवल्या कोविड चाचण्या | corona test | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Corona test

नवी मुंबई महापालिकेने वाढवल्या कोविड चाचण्या

नवी मुंबई : दसरा-दिवाळी सणानंतर (Diwali Festival) शहरात कोविडचे वाढणारी रुग्‍णसंख्या (corona patients) आटोक्यात आणण्यासाठी नवी मुंबई महापालिकेने (Navi Mumbai municipal corporation) दैनंदिन चाचण्यांचे (corona daily test) प्रमाण वाढवण्यात आले आहे. पूर्वीच्या करण्यात येणाऱ्या सरासरी ४ हजार चाचण्यांमध्ये वाढ करीत थेट ७ ते ७, ५०० चाचण्या करण्यात येत आहेत. एवढ्या चाचण्या केल्यानंतर प्रत्यक्षात बाधित रुग्ण (corona patients) सापडण्याचे प्रमाण अगदी कमी असल्‍याचे निष्पन्न होत आहे.

हेही वाचा: चेंबूर : घटस्फोट पत्नी बोलत नसल्यासाचा राग मनात ठेवून केला खून!

कोविड विषाणूंच्या दोन लाटांचा कहर संपूर्ण देशाने पाहिला आहे. २०२० मार्च महिन्यात कोविडच्या पहिल्या लाटेने संपूर्ण जगाला हादरा दिला. पहिली लाट काही महिन्यांमध्ये ओसरल्यानंतर २०२० मध्ये दिवाळीनंतर दुसऱ्या लाटेने डोके वर काढले. पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेची तीव्रता अधिक होती. ऑक्सिजन आणि व्हेंन्टिलेटरअभावी रुग्‍णांचे हाल झाले आणि जीव गेले. सणानंतर आलेल्या दुसऱ्या लाटेचा अनुभव गाठीशी असताना नवी मुंबई महापालिकेने तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने शहरात कोविड चाचण्यांवर पुन्हा एकदा अधिक भर दिला आहे.

रोजच्या चाचण्यांमध्ये वाढ करण्याचे आदेश महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी संबंधित यंत्रणांना दिले आहेत. त्यामुळे हार्बर आणि ट्रान्स हार्बर अशा दोन्ही रेल्वे मार्गावरच्या स्थानकांवर ये-जा करणाऱ्या लोकांच्या चाचण्या केल्या जात आहेत. राज्यातील विविध ठिकाणाहून येणाऱ्या व्यापारी, कामगारांची वर्दळ असणारे एपीएमसी मार्केट अशा कोविड प्रसारासाठी जोखमीच्या ठिकाणी विशेष चाचणी केंद्र कार्यरत आहेत. त्याचप्रमाणे ज्या सोसायटी, वसाहतीत कोरोना रुग्ण आढळतो तेथील प्रत्येक व्यक्तीची चाचणी करून टारगेटेड चाचणीवर भर दिला जात आहे.

कोरोना रुग्णांच्या संपर्कातील व्यक्ती शोधाचे प्रमाणही ३१ इतके राखले जात आहे आहे. कोरोना अजून संपलेला नाही आणि तिसऱ्या लाटेचा धोकाही अद्याप टळलेला नाही, हे लक्षात घेत महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांचे निर्देशानुसार, अगदी दिवाळीच्या ४ दिवसातही दररोज सरासरी साडेचार हजार इतके चाचणीचे प्रमाण ठेवले होते. दिवाळीनंतर आता पुन्हा दैनंदिन साडेसात हजारापर्यंत चाचण्या करण्यात येत आहेत.

रुग्ण दुपटीचा कालावधी ३ हजार दिवसांचा

नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील कोरोना बाधितांचे प्रमाण सध्या कमी आहे. रुग्ण दुपटीचा कालावधी ३ हजार १९६ दिवसांइतका आहे. सध्या सक्रिय रुग्णसंख्येतही घट झाली आहे. दुसऱ्या लाटेच्या अत्युच्च काळात ११ एप्रिल २०२१ ला ११ हजार ६०५ इतकी असलेली सक्रिय रुग्णसंख्या आता ८ नोव्हेंबर २०२१ ला ३०८ इतकी घटली आहे. दिवाळीत ५ नोव्हेंबर २०२१ ला १६ ही दैनंदिन कोरोना बाधितांची संख्या सर्वात कमी होती.

हेही वाचा: परबांना शंभर कोटी मिळाल्यास एसटीचे विलीनीकरण करतील; प्रसाद लाड यांचा टोला

कोरोनाची रुग्णसंख्या घटली असली तरी पहिल्या व दुसर्‌या लाटेतील रुग्णसंख्या कमी होत ठराविक कालावधीनंतर झपाट्याने वाढण्याचा यापूर्वीचा अनुभव लक्षात घेता, चीन, यूके, रशिया व इतर देशांतील तिसऱ्या - चौथ्या लाटेत रुग्णसंख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर कोणत्याही प्रकारे अतिआत्मविश्वास न दाखविता काळजी घेत कोविड सुरक्षा नियमांचे पालन करणे अत्यंत गरजेचे आहे.
- अभिजित बांगर, आयुक्त, नवी मुंबई महापालिका

पनवेल महापालिका क्षेत्रात कोविड रुग्ण घटले

पनवेल महापालिका क्षेत्रातही आरोग्य विभागामार्फत सुरू असलेल्या कोविड चाचण्यांचे प्रमाण कमी झाले नाही. दिवाळीनंतरही सरासरी चार हजार इतक्या चाचण्या केल्या जात आहेत. तसेच शहरातील कोविड रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी २ हजार ६४२ दिवस इतका आला आहे. तसेच पॉझिटिव्हिटी रेट हा १.६ टक्के इतका झाल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे देण्यात आली.

loading image
go to top