UCC Maharashtra News : महाराष्ट्रात समान नागरी कायद्यावरून नवा राजकीय वाद! बिगर हिंदूंवर ‘हिंदू नागरी संहिता’ लादण्याचा प्रयत्न असल्याचा ओवेसींचा आरोप; विधिमंडळात विरोध करणार

Uniform Civil Code Maharashtra: महाराष्ट्रातील प्रस्तावित समान नागरी कायद्याला असदुद्दीन ओवेसी यांनी विरोध केला आहे. हा कायदा बिगर हिंदूंवर हिंदू नागरी संहिता लादण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप करत विधिमंडळातील मंजुरीलाही विरोध दर्शविला.
Uniform Civil Code Maharashtra

Uniform Civil Code Maharashtra

esakal

Updated on: 

मुंबई, (पीटीआय) : महाराष्ट्रातील प्रस्तावित समान नागरी कायदा (यूसीसी) म्हणजे बिगर हिंदूंवर ‘हिंदू नागरी संहिता’ लादण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनचे (एआयएमआयएम) अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी मंगळवारी केला. महाराष्ट्र विधिमंडळात या कायद्याच्या मंजुरीला आणि भाजप व मित्रपक्षांच्या सरकारकडून त्याच्या अंमलबजावणीला आपला पक्ष विरोध करेल, असे त्यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकार हा कायदा लागू करणार असल्याचे स्पष्ट दिसत असल्याचे ते म्हणाले.

Loading content, please wait...