महाविकासआघाडीकडे 160 आमदारांच्या पाठिंब्याचे पत्र; राजभवनात सादर 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 25 नोव्हेंबर 2019

शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सरकार स्थापन करण्याचा जोरदार हालचाली सुरू केल्या असून, आज (सोमवार) सकाळी 160 आमदारांच्या संख्याबळाचे पत्र राजभवनला देण्यात आले आहे. 

मुंबई : राज्यातील नाट्यमय घडामोडींनंतर भाजपचा संभाव्य डाव उधळून लावण्यासाठी शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सरकार स्थापन करण्याचा जोरदार हालचाली सुरू केल्या असून, आज (सोमवार) सकाळी 160 आमदारांच्या संख्याबळाचे पत्र राजभवनला देण्यात आले आहे. 

सत्ता नसेल तर भाजपवाले वेडे होतील : संजय राऊत

गेले दहा दिवस बैठकांचा रतीब लावल्यानंतर सत्तास्थापनेचा महाविकास आघाडीचा हातातोंडाशी आलेला घास अजित पवार यांच्या बंडामुळे हिरावला गेला आहे. त्यामुळे या तीन पक्षांचे नेते कमालीचे सावध झाले आहेत. याचाच एक भाग म्हणून सर्वोच्च न्यायालयात राज्यपालांच्या भूमिकेवर प्रश्‍नचिन्ह उमटवत भाजपने बहुमत लगेच सिद्ध करावे, अशी मागणी करण्याची याचिका दाखल केली आहे. यावर आज निकाल अपेक्षित असला, तरीही भाजपचे संभाव्य डाव उधळून लावण्यासाठी या तीनही पक्षांच्या नेत्यांना कोणताही धोका पत्कारायचा नाही, असे दिसते. त्यामुळे आज सकाळी शिवसेनेचे एकनाथ शिंदे, राष्ट्रवादीचे जयंत पाटील आणि काँग्रेसचे बाळासाहेब थोरात हे राजभवनात गेले. त्यांनी राज्यपालांच्या सचिवांना आमदारांच्या पाठिंब्याचे पत्र दिले आहे.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांनी शपथ घेतली असल्यामुळे सरकार स्थापन झाले आहे. हा शपथविधी अत्यंत चतुराईने केला असून, राष्ट्रपती राजवट रातोरात उठविली गेली. याचा विचार केला तर विधिमंडळात भाजप बहुमताचा आकडा पार करू शकले नाही, तर केंद्र सरकार ही विधानसभा बरखास्त करू शकेल अथवा पुन्हा राष्ट्रपती राजवट लागू करण्याची तडकाफडकी शिफारस करण्याची शक्‍यता नाकारता येत नाही, असे शिवसेनेच्या वतीने सांगण्यात येते. तसेच, राज्यपालांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला सरकार स्थापन करण्यासाठी स्वतंत्रपणे बोलावले होते. त्यांना त्यासाठी अत्यंत कमी वेळ दिला होता. ही बाब लक्षात घेता, सरकार स्थापन झाले नाही तर भाजप कोणत्याही थराला जाऊन इतर कोणाचे सरकार होऊ देणार नाही, असेही शिवसेनेच्या नेत्यांना वाटते.

भाजपवाल्यांनो सावधान! काँग्रेसचा चाणक्य येतोय...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MahavikasAghadi gives 160 MLA Support letter to governor