

Ashish Shelar Says On Thackeray Shivsena
ESakal
कर्जत : महायुतीच्या उमेदवारांचा विजय निश्चित आहे. जो जो उबाठासोबत गेला, तो भुईसपाट झाला, अशा शब्दांत सांस्कृतिक मंत्री आशीष शेलार यांनी विरोधकांवर टीकास्त्र सोडले. कर्जत शहरात त्यांच्या चार सभा झाल्या. कर्जतमध्ये राम गणेश गडकरी नाट्यगृह बांधणार, तसेच पिण्याच्या पाण्याची समस्या, सिमेंट काँक्रीटचे रस्ते, स्वच्छता, पाणीपुरवठा, पर्यावरण संवर्धनासाठी ठोस आराखडा करून ही विकासकामे मार्गी लावण्यात येतील, असे आश्वासन शेलार यांनी दिले.