
मुंबई : मुंबईकरांना भविष्यात ४४० दशलक्ष लिटर पाणी उपलब्ध करून देणाऱ्या गारगाई धरणाचे काम मुंबई महापालिका निवडणुकीच्या आधी मार्गी लागण्याची शक्यता आहे. निवडणुकीच्या तोंडावर सरकारच्या हालचालींना वेग आहे. दोन महिन्यांत निविदा काढा, असे आदेश पालिका आयुक्त भूषण गगराणी यांना सांस्कृतिक कार्यमंत्री तथा मुंबई उपनगरचे पालकमंत्री आशीष शेलार यांनी दिले आहेत.